Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पुण्यात पावसाचे थैमान; ११ जणांचा गेला बळी

najarkaid by najarkaid
September 26, 2019
in राज्य
0
पुण्यात पावसाचे थैमान; ११ जणांचा गेला बळी
ADVERTISEMENT

Spread the love

पुणे: पुण्यात बुधवारी रात्री पावसाचा जोर वाढल्याने हाहा:कार उडाला असून अनेक रस्ते व वस्ते पाण्याखाली गेले आहेत. पावसामुळे घाबरलेल्या नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. आतापर्यंत रौद्र रूप धारण करत पावसाने एकूण ११ जणांचे बळी घेतल्याची माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त डी. वेंकटेशम यांनी दिली. रात्री अरण्येश्वर परिसरातील टांगेवाले कॉलनीत प्रथम पाच जणांचे मृतदेह आढळले. तर ३ ते ४ जण वाहून गेल्याची भीती व्यक्त होत होती. मात्र, मृतांचा आकडा ११ वर पोहोचला आहे. दरम्यान, कात्रज परिसरात नवीन बोगद्याजवळ महामार्गावर दरड कोसळल्यामुळे पुणे-बेंगळुरू महामार्गावरील वाहतूक ठप्प आहे.
रेसकोर्स जवळील चिमटा वस्ती भागात अनेक घरे पाण्याखाली गेली. याबाबत रात्री बाराच्या सुमारास लष्कराच्या दक्षिण कमांडला माहिती देण्यात आली. त्यानंतर जवानांनी तातडीने धाव घेत बचावकार्य सुरू केले. या भागातून ५०० नागरिकांना पाण्यातून सुरक्षितपणे बाहेर काढून जवळच्याच सेंट पॅट्रिक चर्च येथे आणण्यात आले आहे. दांडेकर वस्ती, आंबील ओढा परिसरातील घरांत पाणी शिरल्यामुळे तेथील रहिवाशांना राष्ट्र सेवा दलाच्या निळू फुले कला मंदिरात हलविण्यात आले आहे.
पुणे-सातारा मार्गावर वेळू गावच्या हद्दीत पूरसदृष्य स्थिती आहे. तिथे एक ओम्नी कार वाहून गेली असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पुरंदर तालुक्यात अतिवृष्टी झाली असून नाझरे धरणातून सुमारे दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली.
आंबिल ओढ्याचा तडाखा
दक्षिण पुण्यात जोरदार पावसामुळे कात्रज तलाव भरून आंबिल ओढ्यातून पाण्याचा लोंढा आला. तलावाशेजारील लेक टाउन सोसायटीची भिंत कोसळल्याने इमारतींमध्ये पाणी शिरले. येथून दोन महिला पाण्यात वाहू लागल्या, तेव्हा त्यांना वाचविण्यात आले, तर पद्मावती येथील विवेकानंद पुतळ्याजवळ आंबिल ओढ्याची संरक्षक भिंत कोसळल्याने शेजारील सोसायट्यांमध्ये पाण्याचा लोंढा आला. गुरूराज सोसायटीमध्ये तर दुसऱ्या मजल्यापर्यंत पाणी चढल्याने घबराट उडाली. तसेच, तावरे कॉलनी, बागूल उद्यान, लक्ष्मीनगर या भागातही ओढ्याकाठी पाणी वाढू लागले. दांडेकर पूल परिसरातही काठावरच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरले, त्यामुळे पोलिस आणि अग्निशामक दलाने नागरिकांना बाहेर काढण्याचे काम सुरू केले; तसेच राजकीय पक्ष व सामाजिक कार्यकर्त्यांनीही धाव घेऊन नागरिकांना मदत केली. या भागातील सोसायट्यांमधील नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली होती. शहराच्या चहूबाजूंनी असंख्य नागरिकांनी दूरध्वनी केल्याने अग्निशामक दलाचा दूरध्वनी सातत्याने खणखणत होता. तसेच, कोथरूड, सिंहगड रस्ता, दामोदर नगर, किरकटवाडी, अशा अनेक भागांमध्ये सोसायट्यांत प्रचंड पाणी शिरले. अनेक ठिकाणी पार्किंगमधील वाहने वाहून गेली.
कोथरूडमध्ये भिंत कोसळली
कोथरूड डेपो परिसरातील शास्त्रीनगर भागात मशिदीमागे असलेल्या एका इमारतीजवळील सीमाभिंत पावसाने कोसळली. त्यामुळे पार्किंगमधील सर्व गाड्या पाण्याखाली गेल्या. आजूबाजूची घरे व इमारतीतही पाणी शिरले. माजी नगरसेवक किशोर शिंदे व कार्यकर्त्यांनी धाव घेत सीमाभिंतीला भगदाड पाडून पाणी वाहून जाण्यास वाट करून दिली. कोथरूडमध्ये भुसारी कॉलनीच्या दोन्ही बाजू, शिवतीर्थ नगर, गुजरात कॉलनी, मोरे विद्यालय, एमआयटी परिसरात पाणी साचले होते.
अफवांवर विश्वास ठेवू नका: महापौर
पुणे शहर व परिसरात जोरदार पावसामुळे काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. आम्ही महापालिकेच्या सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. तरी कृपया नागरिकांनी काळजी करू नये तसेच कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. याच बरोबर कुणाला कुठल्याही प्रकारची मदत हवी असल्यास माझ्याशी संपर्क करावा, असे आवाहन महापौर मुक्ता टिळक यांनी केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

चौकशीसाठी बोलविल्यास ईडीला सहकार्यः इश्वरलाल जैन

Next Post

जागावाटप राहू द्या, पुण्यातील पूरस्थितीकडे लक्ष द्या-भुजबळ

Related Posts

Ashok Kharat education truth: ‘कॅप्टन’ म्हणवणारा खरात दहावी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ गणितात नापास!

कॅप्टन’ म्हणवणारा अशोक खरात प्रत्यक्षात १० वी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ म्हणवणारा गणितातच नापास !

March 25, 2026
Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

March 24, 2026
नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

March 24, 2026
AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

March 24, 2026
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Next Post
जागावाटप राहू द्या, पुण्यातील पूरस्थितीकडे लक्ष द्या-भुजबळ

जागावाटप राहू द्या, पुण्यातील पूरस्थितीकडे लक्ष द्या-भुजबळ

ताज्या बातम्या

सरकारी भरती 2026 हजारो पदांसाठी अर्ज सुरू!

सरकारी नोकरीची मोठी संधी! विविध विभागात मेघाभरती; लगेच करा अर्ज

March 25, 2026
Ashok Kharat education truth: ‘कॅप्टन’ म्हणवणारा खरात दहावी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ गणितात नापास!

कॅप्टन’ म्हणवणारा अशोक खरात प्रत्यक्षात १० वी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ म्हणवणारा गणितातच नापास !

March 25, 2026
Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी...विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी…विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

March 25, 2026
Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

March 24, 2026
Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

March 24, 2026
IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

March 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us