पहुर ता जामनेर-;- येथून जवळ असलेल्या पिंपळगाव कमानी तांडा गावाच्या सरपंच पदी कविता अर्जुन राठोड यांची बिनविरोध निवड झाली असून पिंपळगाव कमानी तांडा सरपंच पदाची निवड आज रोजी निवडणूक निर्णय अधिकारी एस एच पवार यांच्या अध्यक्षतेखाली सर्व सदस्यांची बैठक बोलावून कविता राठोड यांची बिनविरोध पुन्हा सरपंचपदी निवड घोषित करण्यात आली .
यापूर्वीही कविता राठोड यांनी सरपंचपद भूषविले असता गावात व्यायाम शाळा सर्व पूर्ण गावात रस्त्याचे काँक्रिटीकरण शौचालय ग्रामपंचायत कार्यालय समशान भूमी मंगल कार्यालय जिल्हा परिषद शाळेचे बांधकाम अधिक कामांमुळे त्यांची सर्व सदस्यांनी सरपंचपदी बिनविरोध निवड केली असून कविता अर्जुन राठोड ह्या माजी सरपंच अर्जुन राठोड त्यांच्या पत्नी असून तसेच स्वर्गीय बंजारा नेते सावजी राठोड यांची स्नुषा आहेत. कविता राठोड यांची निवड होताच सर्व सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले तसेच कविता राठोड यांची निवड झाल्याबद्दल राज्याचे जलसंपदा व वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन जिल्हा परिषद सदस्य अमित देशमुख माजी जिल्हा सदस्य राजधर पांढरे रामेश्वर पाटील युवा नेते राजू जाधव, प्राध्यापक शरद पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, माजी पंचायत समिती सभापती छगन झाल्टे ,,आरोग्य दूत अरविंद देशमुख ,काळू नाईक, पोलीस पाटील, इंदल चव्हाण ,अशोक चव्हाण ,रामा नाईक ,संजय राठोड, विठ्ठल चव्हाण, पत्रकार गणेश पांढरे आदींनी अभिनंदन केले आहे.














