पारोळा – तालुक्यातील पिंपळकोठा गावी पिल्लूक देवाच्या यात्रेच्या ठिकाणी भांडण सोडविण्यास गेला त्याचे वाईट वाटून एकाने कट्टयाने गोळी झाडून एकास गंभीर जखमी केले आहे. ही घटना दिनांक 26 रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत फिर्यादी चतेश्वर नथू पाटील (30) धंदा शेती राहणार पिंपळकोठा हे आरोपी जगदीश पुंडा पाटील राहणार पिंपळकोठा व साक्षीदार यशवंत सुभाष पाटील यांचेतील सुरू असलेले भांडण सोडवण्यासाठी गेले असता त्याचे वाईट वाटून जगदीश पाटील तसेच त्यांच्यासोबत असलेले तीन ते चार अनोळखी इसम यांनी संगणमत करून त्याचे जवळील गावठी कट्टा (बंदूक) मधून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने फिर्यादीच्या छातीवर गोळी मारून त्यास गंभीर दुखापत केली तसेच आरोपी यांच्यासोबत असलेले त्याचे साथीदार यांनी चापटा बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ दमदाटी केल्याची फिर्याद जखमी शनेश्वर पाटील यांनी धुळे पोलिसांना दिल्यावरून भाग ५ गु र न २१८/१९ भादवि कलम ३०७,३२३,५०४,३४, आर्म एक्ट कलम ३, २५ प्रमाणे वरील आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे हे करीत आहेत. जखमी चतेश्वर पाटील हे धुळे येथील सिद्धेश्वर हॉस्पिटल येथे उपचार घेत आहे. यावेळी पारोळा व पिंपळकोठा गावी पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले, अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव भाग श्री गोरे, अमळनेर उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र ससाने, अमळनेर पोलीस निरीक्षक अंबादास मोरे, मारवाडचे सपोनि राहुल फुला यासह पोलिसांनी भेट दिली.