जळगाव, (प्रतिनिधी)- पाणी पुरवठा मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून याबात त्यांनी आपल्या ट्विटर हॅण्डल वरून ट्विट करुन सांगितलं आहे.
ना. पाटील यांनी ट्विट करून म्हटलं आहे की,माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईन. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी व आपली कोरोना चाचणी करून घ्यावी ही विनंती.















