पहुर ता. जामनेर – पहूर येथील ग्रामपंचायतीच्या नवीन पाण्याच्या टाकीचे काम करीत असतांना तोल गेल्याने एका मजुराच्या शरीरात लोखंडी आसारी घुसल्याने जागीच मृत्यु झाल्याची घटना आज सकाळी घडली. तर दुसरा कामगार गंभीर जखमी झाला आहे. अशोक सपकाळे (वय 55, रा.जळगाव ) असे मृताचे नाव आहे.
अशोक सपकाळे आणि वासुदेव पाटील हे दोघे नवीन पाण्याच्या टाकीचे काम करत असतांना अचानक तोल गेल्याने खाली पडले. अशोक सपकाळे खाली पडताच त्यांच्या शरीरात लोखंडी आसारी घुसल्याने जागीच मृत्यु झाला आहे. तर वासुदेव पाटील यांच्या पायाला आसारी लागल्या ते जखमी झाले असून त्यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच, प्रदिप लोढा, राजधर पांढरे, रामेश्वर पाटील, उपसरपंच श्याम सावळे व ग्रामस्थांनी तात्काळ घटना स्थळी धाव घेतली.