Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाणी पुरवठा विभागातील तालुकास्तरावरील समुह व गट समुह समन्वयकांच्या सेवा 30 सप्टेंबरपर्यंत सुरु ठेवण्यास मुदतवाढ

najarkaid by najarkaid
July 29, 2020
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,  दि. 29 – पाणी पुरवठा विभागातंर्गत जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन येथील कंत्राटी सल्लागार कर्मचारी तसेच तालुका स्तरावरील समुह समन्वयक व गट समुह समन्वयकांच्या सेवा 30 सप्टेंबरपर्यंत सुरु ठेवण्यास मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी घेतला आहे. या निर्णयाचा राज्यातील तालुका पातळीवरील 351 गट समन्वयक व 899 समुह समन्वयकांना लाभ होणार असल्याचे ना. पाटील यांनी सांगितले.
राज्य मंत्रीमंडळाच्या आज व्हीसीद्वारे झालेल्या बैठकीनंतर ते जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पत्रकारांशी बोलत होते. ना. पाटील पुढे म्हणाले की, जल जीवन मिशन अंतर्गत तालुका पातळीवर 351 गट समन्वयक व 899 समुह समन्वयकांची पदे स्वच्छ भारत मिशनच्या कामासाठी दि. 6 जुलै, 2011 च्या शासन निर्णयान्वये निर्माण करण्यात आली होती. या पदांचे मानधन व भत्ते राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाच्या सहाय्य निधीमधून करण्यात येत आहे. तथापी, जल जीवन मिशनच्या मार्गदर्शक सुचनांनुसार गट समन्वयक व समूह समन्वयक या पदांसाठी निधीची उपलब्धता नसल्याने या पदांच्या सेवा 31 जुलै, 2020 रोजी समाप्त करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
परंतु ग्रामीण भागासाठी या पदांची आवश्यकता लक्षात घेऊन या पदांना मुदतवाढ मिळावी, याकरीता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करुन पाणीपुरवठा व स्वचछता मंत्री ना. पाटील या पदांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
जळगाव शहरातील मॉल्स व शॉपिंग कॉम्प्लेक्समधील दुकाने सुरु करण्याबाबत लवकरच निर्णय
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जळगाव महानगरपालिकेचा समावेश रेड झोन मध्ये असल्याने जळगाव शहरातील मॉल्स व शॉपिंग कॉम्प्लेक्समधील दुकाने बंद ठेवणेबाबत आदेशीत करण्यात आलेले आहे. सदरची दुकाने सुरु करण्याबाबतचा विषय पालकमंत्री यांनी आज झालेलया राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत उपस्थित केला असता यावर शासन नियमांचे पालन करुन योग्य तो निर्णय घ्यावा असे बैठकीत सांगण्यात आल्याचे पालकमंत्री यांनी सांगितले. त्यानुसार याबाबत पालकमंत्री, जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्त हे चर्चा करुन लवकरच निर्णय घेणार असल्याचेही पालकमंत्र्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील निम्न तापी प्रकल्पावर चर्चा करण्यासाठी आज मुंबईत बैठक
जळगाव जिल्ह्यातील निम्न तापी प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात येणा-या तापी नदीवरील भोकर येथे मोठ्या पुलाचे बांधकाम करणे, जिल्ह्यातील निम्न तापी प्रकल्प, पाडळसे, ता. अमळनेर, या योजनेसाठी निधी उपलब्ध होणे, जिल्ह्यातील पद्यमालय-2 उपसा सिंचन योजनेसाठी निधी उपलब्ध होणेबाबत पालकमंत्र्यांनी सतत पाठपुराव केल्याने या विषयांवर चर्चा करण्यासाठी राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील यांच्या मुंबई येथील दालनात बुधवार, 30 जुलै, 2020 रोजी बैठक आयोजित केली असून या बैठकीसाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. अशोक चव्हाण, या प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील लोकप्रतिनिधीसह विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित राहणार असल्याचेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आवश्यक असणाऱ्या युरिया खताचा 74 टक्के पुरवठा जिल्ह्याला झाला असून उर्वरित पुरवठा येत्या आठवडाभरात उपलब्ध होणार आहेत. शेतकऱ्यांना खतांचा तुटवडा भासू देणार नाही असे सांगून जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यास आवश्यक असणारी साधनसामुग्री, औषधे विशेषत: ॲन्टीजन कीट, फेवीपॅरावीर, रेमीडेसीविअर, टॉसीलीझुमॅप, पीपीई किट, एन 95 मास्कची मागणी करण्यात आली आहे. ही सर्व औषधेही लवकरात लवकर उपलब्ध होतील अशी माहितीही पालकमंत्र्यांनी यावेळी दिली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कोविडमध्ये विकास कामांची गती मंदावू नये म्हणून शासकीय कंत्राटदारांसाठी विविध उपाययोजना जाहीर

Next Post

वाचकांचा विश्‍वास कायम असल्याने वृत्तपत्रांना चांगले दिवस येतील-प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

March 22, 2026
Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

March 22, 2026
बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
Next Post
पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी राज्य मराठी पत्रकार संघ तत्पर-प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे

वाचकांचा विश्‍वास कायम असल्याने वृत्तपत्रांना चांगले दिवस येतील-प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे

ताज्या बातम्या

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

March 22, 2026
नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

March 22, 2026
Ordnance Factory Bhandara Bharti

Ordnance Factory Bhandara Bharti 2026: भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरीत 400 पदांसाठी मोठी भरती

March 22, 2026
Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

March 22, 2026
Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

March 22, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us