- शिवसेना – भाजपा महायुतीच्या उमेदवार किशोर आप्पा पाटील यांच्या प्रचारार्थ आज पाचोरा शहरात काढण्यात आलेल्या रॅली प्रचंड प्रतिसाद

पाचोरा (प्रतिनिधी): येथील शिवसेना लोकनियुक्त नगराध्यक्ष संजय गोहिल यांनी शिवसेना – भाजपा महायुतीच्या उमेदवार किशोर आप्पा पाटील यांच्या प्रचारार्थ आज पाचोरा शहरात प्रचंड मोठी रॅली काढत जोरदार शक्तिप्रदर्शन केले.
या रॅलीच्या समारोपा प्रसंगी नगराध्यक्ष संजय गोहिल यांनी धडाकेबाज भाषण करीत आम्ही पाचोरा न. पा. च्या माध्यमातून पाचोरा शहराचा चेहरा मोहरा बदलावत आहोत असे सांगितले. आज शहरात सुरु असलेले ७० कोटींची भुयारी गटार योजना जेव्हा पूर्ण होईल तेव्हा हे शहर रोगराई मुक्त होईल असे वचन दिले. तसेच या शहरातील रस्त्यांसाठी २०० कोटी रुपयेचा प्रस्ताव पाठवला असून पुढच्या एक वर्षात या शहरातील गल्ली बोळ्यातील व प्रमुख रस्ते पूर्णपणे काँक्रिटीकरण करून पाचोरा सिटी जळगाव जिल्ह्यातील हि एकमेव ड्रीम शहर राहील असे आश्वासन दिले. यावेळी हजारो शिवसैनिक उपस्थिती होते.














