- बांबरुड महादेवाचे येथील माजी सरपंच दिलीप पाटील यांचेसह शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत
पाचोरा : येथील राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा एकदा जोरात धक्का बसला आहे. आज बांबरुड महादेवाचे या गावातील शेकडो राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी आमदार किशोर अप्पा पाटील यांच्या खंबीर नेतृत्वावर विश्वास ठेवत आ.किशोर अप्पा यांच्या उपस्थितीत दिलीप अर्जुन पाटील यांच्या सह कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आज किशोर आप्पा पाटील यांचा लोहारी-लोहटार-बांबरुड असा निवडणूक प्रचार दौरा सुरु होता. या दरम्यान खालील सर्व राष्ट्रवादी च्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. दिलीप अर्जुन पाटील माजी सरपंच, सर्जेराव उत्तम पाटील माजी सरपंच व सदस्य, सुनील गोरख पाटील माजी ग्रा.प.सदस्य वि.का.सो.चे माजी चेअरमन, श्रीकांत भगवान पाटील, राजाराम बागुल, लक्ष्मण सावळे, दिलीप दिनकर पाटील, प्रमोद विनायक पाटील तसेच राजे संभाजी महाराज ग्रुप सर्व सदस्य (बांबरुड महादेवाचे) आदींचा शिवसेनेत प्रवेश झालेला आहे.