
पाचोरा(प्रतिनिधी) – तालुक्यात गेल्या चार दिवसापासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाची नासाडी झाली असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.तरी हे नुकसान शेतकऱ्यांसाठी खूप भयानक आहे.शेतकरी यामुळे हवालदिल झाला आहे.तरी पाचोरा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी आज आमदार किशोर आप्पा पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन केली.
चार दिवसापासुन झालेल्या मुसळधार पावसाने जळगाव जिल्हयातील पाचोरा तालुक्यात हिवरा नदीला पूर आला, खडक देवळा धरण ओव्हर फ्लो झाले त्यामुळे पाचोरा शहरात हिवरा नदीला मोठया प्रमाणत पुर आला आहे तर पाचोरा-भडगाव परिसरात सुरू असलेल्या अतिपावसा मुळें पुन्हा शेतकऱ्यांची ज्वारी बाजरी सोयाबीन मक्का अश्या अनेक पिकांची नासाडी झाली असून कापसाचेही मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.यामुळे शेतकऱ्यांची व सर्वसामान्य नागरिकांनचे जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे म्हणुन तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी पत्रकार परिषदेत करत मी शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे आ. किशोर आप्पा यांनी यावेळी सांगितले.















