पाचोरा,(प्रतिनिधी)- पाचोरा तालुक्यात अवैध गावठी दारूचे भट्टी उद्धवस्त करून मुद्देमाल जप्त करत गुन्हा नोंदवत कारवाई स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव कडून करण्यात आली. पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, यांनी जिल्ह्यात सध्या अवैध गावठी दारुबनविण्याच्या भट्टयामध्ये वाढ होत असल्याने त्यांचेवर कारवाई करण्याचे आदेश बबन आव्हाड,वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांना दिले. त्यावरुन बबन आव्हाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी पोह लक्ष्मण पाटील, जितेंद्र पाटील, भुषण पाटील सर्व नेम. स्थागुशा जळगाव अश्यांचे पथक तयार करण्यात आले होते.
🌹
वर नमुद पथकास गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी शिवरात सुपडु तडवी व गाळण बु शिवरात अमोल जाधव हे बाबुळ जंगल भागात गा.ह.भ.ची भट्टी लावून दारू गाळीत आहे अशी गुप्तबातमीदारा मार्फत बातमी मिळाली होती. त्यावर सदरची बातमी मा.श्री बबन आव्हाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांन कळविल्याने त्यांनी सदर भागात जावून बातमीची खात्री करून पुढील योग्य ती कारवाई करा आदेश दिल्या वरून वर नमुद पथकाने सदर ठिकाणी जावून बातमीची खात्री करून सदर ठिकाणी छापा टाकला असता घटनास्थळी सातगाव डोंगरी ता.पाचोरा शिवारात आरोपी नामे सुपडु रहेमान तडवी यांचे कडून ५४४४०/- रु. किंमतीचे गावठी दारु बनविण्याचे साधनासह रसायन व तयार गावठी हातभट्टीची दारू रोख रुपये असे जप्त करून त्याबाबत पिंपळगाव हरेश्वर पो.स्टे.ला CCTNS NO २३१/२०२४ महाराष्ट्र दारुबंदी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच सदर पथकाने गाळण बु ता.पाचोरा शिवरात घटनास्थळी जावून खात्री करून आरोपी अमोल राजेंद्र जाधव रा. पाचोरा यांचे कडून ८०७५०/- रु. किंमतीचे गावठी दारु बनविण्याचे साधनासह रसायन व तयार गावठी हातभट्टीची दारू रोख रुपये असे जप्त करून त्याबाबत नगरदेवळ ऑटपोस्ट ला गुरनं १७/२०२४ महाराष्ट्र दारुबंदी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई मा.डॉ.श्री महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगाव, मा.श्रीमती कविता नेरकर, अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव, मा.धनंजय येरुळे, उप विभागीय पोलीस अधिकारी पाचोरा भाग यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.









