Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

परमीट रूमचा व्यवसाय अन् तरूणांना पालकमंत्र्यांचा अजब सल्ला

najarkaid by najarkaid
February 14, 2020
in जळगाव
0
परमीट रूमचा व्यवसाय अन् तरूणांना पालकमंत्र्यांचा अजब सल्ला
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव –  नोकरी करण्यापेक्षा व्यवसायाला प्राधान्य द्या असे सांगतांना पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी स्वअनुभवातुन परमीट रूमच्या व्यवसायाबाबत तरूणांना अप्रत्यक्षरित्या या व्यवसायाचा अजब सल्ला दिल्याचा प्रकार आज मुद्रा योजनेच्या मेळाव्यात घडला आणि उपस्थितांच्या भुवयाच उंचावल्या. चक्क पालकमंत्र्यांनी अप्रत्यक्षरित्या का होईना पण असा सल्ला दिल्यावर तरूण काय आदर्श घेतील अशी चर्चाही मेळाव्याच्या ठिकाणी सुरू होती.

के. सी. ई. सोसायटीच्या मैदानावर जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, याकरीता जिल्हास्तरीय मुद्रा समन्वय समितीच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या मेळाव्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले, यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजनाताई पाटील, महापौर भारती सोनवणे, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी तथा मुद्रा बॅक समन्वय समितीचे अध्यक्ष डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, के. सी. ई. सोसायटीचे सदस्य डी. टी. पाटील मान्यवर उपस्थित होते.

काय म्हणाले पालकमंत्री….
यावेळी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, पूर्वीच्याकाळी व्यवसाय कोणता निवडावा, त्यासाठी लागणारे भांडवल कोठून उभे करावे यासाठी कोणीही मार्गदर्शन करीत नसे. मात्र तशाही परिस्थीतीत अर्थाजन म्हणुन मी सुरवातीला एक हॉटेल भाड्याने घेतली. सुरवातीला शाकाहारी सुरू केले. ते काही चालेना. मग हॉटेल मांसाहारी केली. थोडी चालायला लागली. मग मांसाहारी सोबत परमीट रूमही सुरू केले. हॉटेल मांसाहारी असतांना 4 हजार रूपयांचा गल्ला होता. परमीट रूम केल्यानंतर हा गल्ला 20 हजारांवर पोहोचला. मध्यंतरी हा व्यवसाय देखिल चालत नव्हता. तेव्हा एकाने हे कर.. ते कर.. आपण राजकारणात आहोत… हा व्यवसाय चांगला नाही पण आपण नाही केला तर कोणी तरी हा व्यवसाय करणारच आहे. म्हणून मग तत्कालीन जिल्हाधिकारी विजय सिंघल यांच्याकडुन परमीटचे लायसन मिळाले अशा शब्दात स्वअनुभव कथन करतांना पालकमंत्री ना. पाटील यांनी परमीट रूमच्या व्यवसायावरून तरूणांना अप्रत्यक्षरित्या अजबच सल्ला दिला. पालकमंत्र्यांच्या या अजब सल्ल्याने उपस्थितांच्या भुवयाच उंचावल्या. यावेळी परमीटच्या व्यवसायावरून त्यांनी आ. राजूमामा भोळे यांच्याही नावाचा उल्लेख केला.

जिल्हाधिकार्‍यांनी केले मार्गदर्शन
जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे म्हणाले की, तरुणांनी आपापल्या भागात जे व्यवसाय चांगल्या प्रकारे चालू शकतात त्यांची निवड करावी. उद्योग, व्यवसायासाठी बँकाकडून अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्यात येत आहे. अर्थसहाय्यासाठी कोणाची अडवणूक होत असेल तर तसेही कळवावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी जि.प.चे सीईओ डॉ. बी.एन. पाटील यांनी मार्गदर्शन केले. सुत्रसंचालन ज्योती राणे यांनी केले तर उपस्थितांचे आभार जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील यांनी मानले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सिध्दार्थ भोकरे फिल्म निर्मिती कार्यालयाचे शरद पवारांच्या हस्ते उदघाटन

Next Post

विनापरवानगी टॉवर उभारणार्‍यांवर गुन्हे दाखलचे आदेश

Related Posts

बोदवडचे  नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

बोदवडचे नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

April 13, 2026
कष्ट, जिद्द आणि स्वप्नांचा विजय : कोचुरचा हर्षल पाटील राज्य कर विभागात अधिकारी

कष्ट, जिद्द आणि स्वप्नांचा विजय : कोचुरचा हर्षल पाटील राज्य कर विभागात अधिकारी

April 8, 2026
जळगाव : गॅस दरवाढीविरोधात रिक्षाचालकांचा आक्रोश; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

जळगाव : गॅस दरवाढीविरोधात रिक्षाचालकांचा आक्रोश; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

April 7, 2026
Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
Next Post
विनापरवानगी टॉवर उभारणार्‍यांवर गुन्हे दाखलचे आदेश

विनापरवानगी टॉवर उभारणार्‍यांवर गुन्हे दाखलचे आदेश

ताज्या बातम्या

उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

April 14, 2026
संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
Dr.Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : चैत्यभूमी येथे दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाची मान्यवरांकडून पाहणी

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : चैत्यभूमी येथे दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाची मान्यवरांकडून पाहणी

April 14, 2026
बोदवडचे  नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

बोदवडचे नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

April 13, 2026
Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” - सचिन मानकावडे

Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” – सचिन मानकावडे

April 13, 2026
Free Health Checkup Camp: वाघ नगर येथे मोफत नेत्र व आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न

वाघ नगर परिसरात मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात संपन्न

April 13, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us