जळगाव, (प्रतिनिधी) – जळगाव शहर महानगर पालिकेच्या पुढील कार्यकाळासाठी भारतीय जनता पार्टीचे जुने कार्यकर्ते माजी जिल्हा सरचिटणीस राजेंद्र घुगे पाटील यांची स्थायी सभापती निवड करण्यात आली तसेच महिला बालकल्याण सभापती सौ.रंजनाताई भरत सपकाळे या दोघांची आज दि.२२ ऑक्टोंबर रोजी निवड झाली.या निवडीबद्दल भाजप जळगाव जिल्हा महानगराच्या वतीने नवनियुक्त पदाधिकारांचा सत्कार भाजप कार्यालय वसंतस्मृती येथे दुपारी १२.३० वाजता जिल्हाध्यक्ष आ.सुरेश भोळे (राजूमामा)व महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी महापौर भारतीताई सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आला
याप्रसंगी उपमहापौर डॉ.अश्विनभाऊ सोनवणे,गटनेते भगत बालाणी,सभागृह नेते ललित कोल्हे,प्रदेश महिला उपाध्यक्षा उज्वलाताई बेंडाळे,जिल्हापदाधिकारी विशाल त्रिपाठी,डॉ.राधेश्याम चौधरी, महेश जोशी,नितीन इंगळे,चंदन महाजन,सुशील हासवाणी,विठ्ठल पाटील, प्रकाश पंडित सुनील खडके मंडल अध्यक्ष अजित राणे, प्रवीण कोल्हे,संजय लुल्ला, महिला अध्यक्षा दिप्तीताई चिरमाडे,उषा पाठक नगरसेविका सरिता नेरकर,पार्वताताई भिल,गायत्रीताई राणे,प्रतिभाताई पाटील,अँड.सुचिताताई हाडा,शोभाताई बारी,ज्योती ताई चव्हाण सुरेखा सोनवणे रेखाताई पाटील,आघाडी अध्यक्ष कुमार सिरामे, तसेच सन्मानीय नगरसेवक,पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
















