जळगाव – शहरातील नूतन मराठा महाविद्यालयात गेल्या दीड वर्षापूर्वी सत्ता संघर्षातून झालेल्या हाणामारी प्रकरणी नगरसेवक स्व.नरेंद्र पाटील यांचे बंधू विजय पाटील यांना मंगळवार दि.10 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास जिल्हापेठ पोलिसांनी अटक केली.
गेल्या दीड वर्षापूर्वी नूतन मराठा महाविद्यालयात भोईटे आणी पाटील गटात सत्ता संघर्षातून हाणामारी झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी तब्बल दीड वर्षांनंतर पोलिसांनी विजय पाटील यांना मंगळवारी ताब्यात घेतले. दरम्यान या घटनेमुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. जिल्हापेठ पोलीस ठाण्यात या प्रकारामुळे समर्थकांची प्रचंड गर्दी जमली आहे.