जळगाव – जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याचे निर्देश कृषी, महसूल व ग्रामविकास विभागाला देण्यात आले असून, आतापर्यंत ६० टक्के पंचनाम्यांचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित पंचनाम्यांचे काम तीन दिवसांत पूर्ण करून राज्य सरकारला अहवाल सादर करण्यात येणार असून, शेतकऱ्यांच्या पाठीमागे सरकार खंबीरपणे उभे आहे. धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी सांगितले.















