Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ना.गिरीशभाऊंच्या वक्तव्याने जळगावात शिवसेनेचे स्वप्न भंगणार !

najarkaid live by najarkaid live
July 13, 2019
in जळगाव, राजकारण
0
जामनेर मतदार संघात एकच हुकमी एक्का ,ना. महाजनच पुन्हा निवडून येण्याचा दावा ठरतोय पक्का !
ADVERTISEMENT
Spread the love

जळगाव – भाजपाचे संकट मोचक ना.गिरीश महाजन यांनी जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे हेच राहतील अशी घोषणा आषाढीच्या दिवशी केल्याने काही दिवसांपूर्वीच राजुमामांच्या “आमदारकीवर” आलेले संकट टळले आहे असेच म्हणावे लागेल.दुसरीकडे “दादा” निवडणूक लढतील या शिवसेनेच्या उत्साहावर मात्र विरजण पडले आहे.तर जिल्ह्यात आगामी विधानसभा निवडणुका ना. गिरीश महाजन यांच्याच नेतृत्वात पक्ष लढविणार असल्याचे समजते. 

कुठलीच निवडणूक लढणार नसल्याची घोषणा करणारे शिवसेनेचे नेते अचानक जळगाव शहर विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केल्यावर भाजपा च्या गटात खळबळ उडाली होती. जळगाव शहर विधानसभेची जागा शिवसेनेच्या वाट्याला जाते की काय? असेच भाजपच्या सामान्य कार्यकर्त्यांना वाटायला लागले होते.आमदार सुरेश भोळे (राजूमामा) यांनी देखील चार- पाच दिवस अगोदर एका पत्रकार परिषदेत पक्षाने तसेच ना.गिरीशभाऊंनी आदेश दिले तर सुरेशदादा जैन यांचा सुद्धा आगामी विधानसभा निवडणुकीत प्रचार करू असे सांगून टाकले होते.यामुळे भाजपा गटात देखील चांगलीच खळबळ उडाली होती.तर शिवसेनेच्या गोटात उत्साह संचारला होता त्या उत्सवावर मात्र जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गिरीशभाऊ महाजन यांनी जळगाव शहर विधानसभेचे आमदार सुरेश भोळे (राजूमामा) हेच राहतील अशी घोषणाच आषाढीच्या दिवशी केल्याने विरजण पडले आहे असेच म्हणावे लागेल.

जळगाव शहराची जागा भाजपाच्या वाट्याला गेल्यास उमेदवार विद्यमान आमदार राजूमामा भोळे हेच असतील तरी देखील प्रत्यक्षात सुरेशदादांनी जर जळगाव शहर मतदार संघातून मधून निवडणूक लढवण्याचे ठरवले तर, युतीधर्मा नुसार दादांना पक्षाकडून उमदेवारी मिळणे अशक्य आहे.जळगाव शहर मतदार संघातून भाजपाचा विद्यमान आमदार असल्याने ही जागा भाजपलाच सुटेल यात शंका नाही.त्यात राज्याचे संकट मोचक असलेले ना.गिरीशभाऊंनी राजुमामाच… आमदार असतील अशी घोषणाच करून टाकल्याने राजुमामांच्या उमेदवारीवर थोड्या काळा करिता आलेले संकट मात्र संपुष्टात आणले आहे.असे असले तरी दादांनी निवडणूक लढणार म्हटल्यावर भाजपाची चिंता वाढली होती मात्र ना.गिरीशभाऊ यांनी अल्पकाळातच या विषयावर निर्णय घेऊन टाकल्याने जळगाव शहर मतदार संघाच्या जागेच्या विषयावर पडदा पडल्या गेला.
जळगाव शहर मतदार संघात भाजपने चांगली पकड जमवली आहे. महानगर पालिका निवडणुकीत मोठे यश मिळवून सुरेशदादांच्या सत्तेला जोरदार धक्का दिला होता.बहुमताच्या जोरावर पहिल्यांदाच जळगाव मनपाला भाजपचा महापौर मिळाला तसेच आमदार देखील भाजपाचाच आहे.भाजपचे हे यश पाहता जळगाव शहर मतदार संघ भाजपा सहजा सहजी शिवसेनेला कसा सोडेल असा प्रश्न अनेक राजकीय तज्ञांनी उपस्थित केला आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपा – सेना युती झाल्यास जळगाव शहर मतदार संघावर दादांनी दावा करू नये याकरिता भाजपचे संकट मोचक ना.गिरीशभाऊ हे दादांना काय “शब्द” देता हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अभिनेत्री श्रीदेवींचा खूनच : आयपीएस अधिकाऱ्याचा पुराव्यानिशी दावा !

Next Post

इंटरनेट- सोशल मीडियाचा अतिवापर एक प्रकारचे व्यसन !

Related Posts

Bangladeshi Woman Trafficking | जळगावमध्ये देहविक्रीचा पर्दाफाश !

July 25, 2025
Bhusawal Railway Route Change | भुसावळ विभागातील रेल्वे मार्गात बदल, प्रवाशांनी नोंद घ्या!

Doctor blackmail case Pachora : पाचोऱ्यात डॉक्टरला अश्लील क्लिप व्हायरल करण्याची धमकी, 2 कोटींची खंडणी, नेमकं प्रकरण काय?

Doctor blackmail case pachora : डॉक्टरला अश्लील क्लिप व्हायरल करण्याची धमकी, 2 कोटींची खंडणी, नेमकं प्रकरण काय?

July 25, 2025
मुख्यमंत्री सहायता निधी योजना कशी मिळवावी? Mukhyamantri Sahayata Nidhi Yojana Application Process

Prafull Lodha Honeytrap : फोटोवरून राजकारण तापलं – खडसे यांचा महाजनांवर जोरदार हल्लाबोल

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Next Post
इंटरनेट- सोशल मीडियाचा अतिवापर एक प्रकारचे व्यसन !

इंटरनेट- सोशल मीडियाचा अतिवापर एक प्रकारचे व्यसन !

ताज्या बातम्या

Bangladeshi Woman Trafficking | जळगावमध्ये देहविक्रीचा पर्दाफाश !

Bangladeshi Woman Trafficking | जळगावमध्ये देहविक्रीचा पर्दाफाश !

July 25, 2025
Bhusawal Railway Route Change | भुसावळ विभागातील रेल्वे मार्गात बदल, प्रवाशांनी नोंद घ्या!

Bhusawal Railway Route Change | भुसावळ विभागातील रेल्वे मार्गात बदल, प्रवाशांनी नोंद घ्या!

July 25, 2025
Doctor blackmail case Pachora : पाचोऱ्यात डॉक्टरला अश्लील क्लिप व्हायरल करण्याची धमकी, 2 कोटींची खंडणी, नेमकं प्रकरण काय?

Doctor blackmail case pachora : डॉक्टरला अश्लील क्लिप व्हायरल करण्याची धमकी, 2 कोटींची खंडणी, नेमकं प्रकरण काय?

July 25, 2025
मुख्यमंत्री सहायता निधी योजना कशी मिळवावी? Mukhyamantri Sahayata Nidhi Yojana Application Process

मुख्यमंत्री सहायता निधी योजना कशी मिळवावी? Mukhyamantri Sahayata Nidhi Yojana Application Process

July 25, 2025
Prafull Lodha Honeytrap : फोटोवरून राजकारण तापलं – खडसे यांचा महाजनांवर जोरदार हल्लाबोल

Prafull Lodha Honeytrap : फोटोवरून राजकारण तापलं – खडसे यांचा महाजनांवर जोरदार हल्लाबोल

July 25, 2025
today Rashi bhavishya : आजचे राशीभविष्य

Today Rashi Bhavishya (25 July 2025) | आजचे राशीभविष्य

July 25, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us