Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नाशिक विभागातील शासकिय सेवेत निवड झालेल्या महिला उमेदवारांना लवकरच मिळणार नियुक्ती

najarkaid by najarkaid
October 12, 2020
in राज्य
0
ADVERTISEMENT

Spread the love

  • नाशिक विभागातील शासकिय सेवेत निवड झालेल्या महिला उमेदवारांना लवकरच मिळणार नियुक्ती;नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र पडताळणीसाठी जिल्हास्तरावर समिती नेमणार: विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे

नाशिक दि. 12 :शासकीय सेवेत 30 टक्के महिला आरक्षणामधून निवड झालेल्या विभागातील जवळपास 200 महिला उमेदवारांचे अर्ज विभागीय आयुक्त कार्यालयाकडे आले आहेत. हे अर्ज लवकरच विभागातील नाशिक, जळगांव, अहमदनगर, धुळे आणि नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविण्यात येणार आहेत. रिक्त पदांच्या दृष्टीने आणि महिला उमेदवारांच्या पदस्थापनेचा प्रश्न लवकर मार्गी लागण्यासाठी प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी शासन निर्णयानुसार समिती नेमून विमुक्त जाती व भटक्या जमाती, ओबीसी संवर्गातील महिलांच्या नॉन क्रिमिलिअर प्रमाणपत्राची पडताळणी लवकरात लवकर करावी. तसेच पडताळणी केलेले अहवाल शिफारशींसह आयुक्त कार्यालयाला सादर करावे, अशा सूचना विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केल्या आहेत.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या समिती कक्षात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पाचही जिल्ह्यांचा या विषयासंदर्भातील आढावा घेण्यात आला. त्यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे बोलत होते.यावेळी नाशिक येथून सूरज मांढरे, जळगाव येथून अभिजित राऊत, अहमदनगर येथून राहूल द्विवेदी, धुळे येथून संजय यादव, नंदुरबार येथून डॉ.राजेंद्र भारुड असे विभागातील सर्व जिल्हाधिकारी उपस्थित होते. विभागीय आयुक्त कार्यालयातून उपायुक्त (महसूल) दिलीप स्वामी, उपायुक्त (सामान्य प्रशासन) रघुनाथ गावडे, उपायुक्त अर्जुन चिखले, सहआयुक्त स्वाती थविल, उपसंचालक भूमिअभिलेख ए.एस.कुलकर्णी, तहसिलदार नरेश बहिरम, तहसीलदार योगेश शिंदे आदी उपस्थित होते.

विभागीय आयुक्त श्री. गमे म्हणाले, शासकीय, निमशासकीय सेवेत महिलांना 30 टक्के आरक्षण आहे. त्यामध्ये अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती संवर्गातील महिलांसाठी नॉन क्रिमिलिअर प्रमाणपत्राची आवश्यकता नसते. परंतु इतर विमुक्त जाती व भटक्या जमाती, ओबीसी संवर्गतील महिलांना शासकीय सेवेसाठी नॉन क्रिमिलिअर प्रमाणपत्राची आवश्यकता असते. या नॉन क्रिमिलिअर पडताळणीचे काम लवकर व्हावे यासाठी शासनाने धोरणात्मक निर्णय घेतला असून, त्यासाठी शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. जर महिलांच्या नॉन क्रिमिलिअरची पडताळणी लवकरात लवकर होऊन शिफारस करण्यात आली, तर त्यांना पदस्थापना देणे सोयीचे होईल व रिक्त पदांचा प्रश्न देखील सुटणार असल्याचे श्री. गमे यांनी सांगितले आहे.

शासननिर्णयानुसार जिल्हास्तरीय जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती व विभागस्तरीय समिती अशा दोन प्रकारच्या समिती तयार करण्यात आलेल्या आहेत. विभागस्तरीय समितीकडे एमपीएससी, इतर शासकीय विभागांकडून निवड झालेले साधारण 200 अर्ज प्राप्त झाले आहेत. विभागास्तरीय समितीकडे आलेले सर्व अर्ज जिल्हास्तरीय समितीकडे पाठविण्यात येवून जिल्हाधिकारी यांनी उपसमिती गठीत करुन जिल्हास्तरावर बैठक घेण्यात यावी. त्यामध्ये नॉनक्रिमिलिअर संदर्भातील पडताळणीचे काम सुरळीत करण्याबाबतच्या सूचना यावेळी विभागीय आयुक्त श्री. गमे यांनी दिल्या आहेत.

शासननिर्णयानुसार नॉन क्रिमिलिअर प्रस्तावांची पडताळणी करीत असतांना उपविभागीय अधिकारी किंवा उपजिल्हाधिकारी यांनी महिला उमेदवाराला दिलेल्या उत्पन्नाच्या दाखल्याबाबत कुणाची तक्रार असेल त्यासाठी जिल्हासमितीने तक्रारदाराला समक्ष बोलवावे. तक्रारदाराचे म्हणणे ऐकून घ्यावे. त्याबरोबरच ज्यांच्याविषयी तक्रार असेल त्याचेही म्हणणे ऐकून घ्यावे. या व्यतिरिक्त गृह चौकशी करायची असेल तर पोलीसांची किंवा इतर विभागांची मदत घेण्यात यावी. तसेच चौकशी पूर्ण करुन जिल्हाधिकाऱ्यांच्या शिफारशीसह तो अहवाल विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पाठविण्याबाबतची सूचना श्री. गमे यांनी जिल्हाधिकारी यांना केली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अर्ज आल्यानंतर 30 दिवसामध्ये चौकशी पूर्ण करुन अहवाल पाठविण्यात यावा, तसेच महिन्यातून समितीच्या दोन बैठका घेण्यात याव्यात. त्या समितीत आलेले सर्व अर्ज विचारात घेवून त्यावर शिफारस करावी तसेच जो अर्ज रद्द करावयाचा असेल, तशीही शिफारस करुन पाठविण्यात यावे. साधारण विभागाकडे एमपीएसीने व इतर शासकीय विभागांकडून निवड झालेले जवळपास 200 पदे आहेत. तरी रिक्त पदांच्या दृष्टीने तातडीने यामध्ये कार्यवाही करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिल्या.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

केंद्रीय कर्मचाऱ्यांना “एलटीसी कॅश व्हाउचर स्कीम”

Next Post

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या तालुका अध्यक्षपदी रामकृष्ण बी.पाटील यांची नियुक्ती

Related Posts

नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

March 24, 2026
AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

March 24, 2026
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

March 23, 2026
तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
Next Post
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या तालुका अध्यक्षपदी रामकृष्ण बी.पाटील यांची नियुक्ती

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या तालुका अध्यक्षपदी रामकृष्ण बी.पाटील यांची नियुक्ती

ताज्या बातम्या

IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

March 24, 2026
Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

March 24, 2026
AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

March 24, 2026
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us