चोपडा – तालुक्यातील नागलवाडी येथे अवैधरित्या दारूची विक्री होत असल्याने गावातील महिलांनी दारू विक्रेत्यांच्या घरात छापे पाडून दारू पकडून चोपडा शहर पोलीस स्टेशनला धडक देऊन दारू विक्रेत्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले .
यावेळी पोलीस ठाण्यासमोर महिलांनी घोषणाबाजी करून गावात पोलिसांनी दारू विक्री बंद करावी असा आग्रह महिलांनी यावेळी धरला . या वेळी गावातील मीराबाई भिल, रेखाबाई पाटील,ज्योती भिल, हिरालाल भिल, यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या . दारू विक्रेता समाधान सोनवणे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.