
जळगाव ;- भाजपच्या नगरसेविका मीना सपकाळे यांचे पती आणि हमाल मापाडी कामगार संघटनेचे अध्यक्ष धुडकु सपकाळे यांच्यासह एकावर बुधवार ७ रोजी दुपारी कारमधून येत पाच जणांनी तलवारीने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली होती . याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत पाचही आरोपीना अटक केली होती.त्यांना आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या संशयितांना सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावरून पोलिसांनी पाच जणांना अटक केली होती . यात कोमेश सपकाळे, मयूर इंद्रराज सपकाळे, नितीन प्रकाश सोनवणे, मनोज प्रकाश सोनवणे, विजय उर्फ भुऱ्या कमलाकर सपकाळे या पाचही जणांना न्यायालयात हजर केले असता सर्वाना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
















