Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

देशासाठी ’सुवर्ण’ जिंकायचं होतं, पण दुर्दैवानं…: पुनिया

najarkaid by najarkaid
September 22, 2019
in क्रीडा
0
देशासाठी ’सुवर्ण’ जिंकायचं होतं, पण दुर्दैवानं…: पुनिया
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली- भारतीय मल्ल दीपक पुनियाची जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेतील ’सुवर्ण’ संधी हुकली आहे. पायाला झालेल्या दुखापतीतून न सावरल्यानं पुनियानं पुरुषांच्या 86 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीतून माघार घेतली आहे. माझ्या डाव्या पायाला अजूनही सूज आहे. मला देशासाठी सुवर्ण पदक जिंकायचं होतं. पण दुर्दैवानं हे घडणार नाही. दुखापतीतून सावरेन असं मला वाटलं होतं, पण तसं झालं नाही, असं दीपकनं ’टाइम्स ऑफ इंडिया. कॉम’ला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत सांगितलं.
नूर-सुलतान येथे पार पडलेल्या 86 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत दीपकनं स्टीफन रीजमुथवर 8-2 अशी मात करत अंतिम फेरीत धडक मारली होती. त्याचा सामना इराणच्या हसन याझदानीशी होणार होता. मात्र, पायाला झालेल्या दुखापतीतून तो सावरला नाही. त्यामुळं त्यानं माघार घेतली आणि त्याची सुवर्ण पदकाची संधी हुकली. ’टाइम्स ऑफ इंडिया. कॉम’ला दिलेल्या मुलाखतीत दीपकनं या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आता त्याला रौप्य पदकावर समाधान मानावं लागेल. ’स्पर्धेच्या सुरुवातीलाच दुखापतीला सामोरं जावं लागलं. माझ्या डाव्या पायाला अजूनही सूज आहे. मला देशासाठी सुवर्ण पदक जिंकायचं होतं, पण दुर्दैवानं तसं होणार नाही. अंतिम लढतीपर्यंत दुखापतीतून सावरेन असं मला वाटलं होतं. पण तसं झालं नाही, अशी खंत त्यानं बोलून दाखवली. अंतिम लढतीत खेळण्याची इच्छा होती. पण दुखापत ही क्रीडापटूच्या जीवनाचा भाग आहे, असंही तो म्हणाला. दीपकनं यापूर्वीच ऑलिम्पिक प्रवेश निश्चित केला आहे. ’ही माझ्यासाठी गौरवास्पद बाब आहे. टोकियोला जात असल्यानं मी खूपच उत्साहित आहे आणि देशाला मी निराश करणार नाही,’ असा शब्दही त्यानं यावेळी दिला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अल कायदा’च्या दहशतवाद्याला अटक

Next Post

शहांनी कलम 370 वर काश्मिरात बोलावं: काँग्रेस

Related Posts

IPL : 15 चेंडूत अर्धशतक! वैभव सूर्यवंशीचा स्फोटक खेळ, राजस्थानचा सलग चौथा विजय

April 11, 2026
Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

March 28, 2026
बुद्धिबळ स्पर्धेत दिव्या ‘वर्ल्ड क्विन!'

Divya Deshmukh World Chess Queen: बुद्धिबळ स्पर्धेत दिव्या ‘वर्ल्ड क्विन!’

July 28, 2025
Team India dominates England | राहुल, गिल, जडेजा, सुंदरचा इंग्लंडवर दणदणीत धडाका

WCL India vs Pakistan Legends cancel

WCL India vs Pakistan Legends सामना रद्द : भारतीय खेळाडूंचा विरोध

July 20, 2025
क्राईम न्यूज

Husband Murder by Wife and Lover Case ;पत्नीने प्रियकराच्या मदतीने नवऱ्याचा केला खून |

July 12, 2025
Next Post
शहांनी कलम 370 वर काश्मिरात बोलावं: काँग्रेस

शहांनी कलम 370 वर काश्मिरात बोलावं: काँग्रेस

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us