सावदा ता; रावेर- मुक्ताईनगर मतदारसंघात असलेल्या सावदा येथील भारतीय जनता पक्ष्यांच्या कार्यकर्त्यांनी दि.२३ रोजी अचानक सकाळी ८ वाजता महाराष्ट्रचे मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मुखमंत्री पदाची शपत घेतली व मी पुन्हा आलो, मी पुन्हा आलो चे बॅनर झडकविण्यात आले होते.
भाजपप्रेमी भाजपचे काही कार्यकर्ते यांनी बस स्थानक परिसरात त्याच वेळी व त्यादिवशी फटाक्यांची आतिषबाजी करून एकमेकांना पेढे भरविण्यात येऊन आनंद व्यक्त करण्यात आला. तसेच बस्थानाक परिसरात फडणविसांचे अभिनंदनाचा मोठे महाकाय होरर्डींग बॅनर लावण्यात आले होते. तब्बल ८० तासानंतर फडणवीस यांनी आपला मुखमंत्री पदाचा राजीनामा राज्यपाल यांचेकडे सोपविला त्यामुळे ते बॅनर खाली उतरविण्यात आले. त्या बॅनरची सर्वत्र एकच चर्चा सुरू आहे.