Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दुसऱ्या लाटेत राज्यात कोविडचा मोठ्या प्रमाणात फैलाव ;पर्यायी उपचारपद्धती राबविण्याबाबत चाचपणी सुरु

najarkaid by najarkaid
May 5, 2021
in राज्य
0
दुसऱ्या लाटेत राज्यात कोविडचा मोठ्या प्रमाणात फैलाव ;पर्यायी उपचारपद्धती राबविण्याबाबत चाचपणी सुरु
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई, दि. 5 : दुसऱ्या लाटेत राज्यात कोविडचा मोठ्या प्रमाणात फैलाव झाला आहे या रुग्णांवर उपचार करण्यासाठी आयुषच्या पर्यायी उपचारपद्धती राबविण्याबाबत चाचपणी करण्यात यावी, असे निर्देश वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिले. श्री.देशमुख यांच्या उपस्थितीत आज आयुष टास्कफोर्सच्या सदस्यांची ऑनलाइन बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते.

वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख म्हणाले की, गेल्या जवळपास वर्षभरापासून अधिक काळ कोविड संकटाशी आपण सामना करत असून अजूनही रुग्णसंख्या आटोक्यात आलेली नाही. वाढत्या कोविड रुग्णांवर उपचारासाठी डॉक्टर्स कमी पडत आहेत हे लक्षात घेऊन या कामी राज्यात सध्या उपलब्ध असलेल्या अडीच लाख आयुष डॉक्टरांचा उपयोग चांगल्या पद्धतीने कसा करून घेता येईल याबाबत विचार करण्यात यावा अशी सूचनाही त्यांनी केली.

कोविड रुग्णांची संख्या तातडीने कमी करणे आवश्यक आहे. कोविडची सौम्य लक्षणे असणाऱ्यांना आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी अशा पर्यायी उपचार पद्धती देता येऊ शकतात. त्यासाठी आदर्श नियमावली (एस.ओ.पी) तयार करण्याचे काम आयुष संचालनालयामार्फत तातडीने करण्यात यावे, असेही श्री.देशमुख यांनी सूचित केले.

कोविडची लागण होऊ नये यासाठी त्याचप्रमाणे कोविड बाधित रुग्णांसाठीही प्रतिकार शक्ती वाढविणाऱ्या अनेक औषधांना केंद्रीय आयुष मंत्रालयाने मान्यता दिली आहे तसेच अशा प्रकारची अनेक चांगली औषधे मान्यतेच्या प्रतीक्षेत आहेत ही औषधे लवकरात लवकर कशी उपलब्ध करून देता येतील याबाबतही प्रयत्न करण्याचे यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी सांगितले.

सध्या दिल्ली आणि जयपूरमध्ये कोविडसाठी आयुर्वेद उपचाराला मान्यता देण्यात आली असल्याने हाच पॅटर्न महाराष्ट्रातही राबविण्यासाठी येत्या काळात प्रयत्न करण्यात येईल. यामुळे आयुष डॉक्टरांचे मोठे संख्याबळ उपलब्ध होणार आहे. आयुष अंतर्गत येणाऱ्या पॅथींना उपचारांसाठी परवानगी द्यावी असे केंद्र शासनाकडे आयुष संचालनायामार्फत पत्र देण्यात येईल, असेही श्री.देशमुख यांनी सांगितले.

श्री.देशमुख म्हणाले की, कोविडसाठी उपचार पद्धती निरनिराळ्या असून ऍलोपॅथी यामध्ये प्रमुख भूमिका निभावत असली तरी अल्टरनेटीव्ह थेरपी निरनिराळ्या असू शकतात. आयुष संचालनालयांतर्गत येणाऱ्या वेगवेगळ्या पॅथींच्या डॉक्टरांनी या क्षेत्रात चांगले काम आणि संशोधन केलेले आहे. त्यामुळे आपल्या संशोधनाच्या कामाचा, ज्ञानाचा उपयोग या काळात करून घेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. येत्या काळात होमिओपॅथिक आयुर्वेदिक, औषधे यांना मान्यता देताना त्यांनी मानके परिपूर्ण केली आहेत का हे तपासून घेणे आवश्यक आहे.

आजच्या या बैठकीस वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ.तात्याराव लहाने, आयुष संचालक डॉ.कुलदीप राज कोहली, डॉ. झुबैर शेख, डॉ. मनीष पाटील, डॉ. जवाहर शाह, डॉ. शुभा राऊळ, डॉ. उर्मिला पिटकर,
डॉ. उदय कुलकर्णी, डॉ. मनोज राजा, डॉ. जसवंत पाटील, डॉ. राजश्री कटके, डॉ. संजय लोंढे, डॉ. अमित दवे, डॉ. राजेंद्र निरगुडे, डॉ. नवीन पावस्कर, डॉ. पुरुषोत्तम लोहिया, डॉ. हरीश बी सिंग, जयंत वकनाली आदी उपस्थित होते.

Spread the love
Tags: #BreakTheChain #StayHome #corona
ADVERTISEMENT
Previous Post

कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे चिंता…

Next Post

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाबाबत दिलेल्या निर्णयाबद्धल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवेदन… काय म्हणाले वाचा

Related Posts

Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

March 30, 2026
Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

March 30, 2026
SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

March 30, 2026
Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

March 29, 2026
Pune Police Bharti Death: पोलीस भरती दरम्यान मृत्यू! मैदानावर हृदयद्रावक घटना

Pune Police Bharti Death: पोलीस भरती दरम्यान मृत्यू! मैदानावर हृदयद्रावक घटना

March 28, 2026
ACB Trap 🚨 2 लाखांची लाच घेताना अधिकारी अटक!

ACB Trap : २ लाखांची लाच घेताना प्रांतधिकाऱ्याला अटक; ACB ची कारवाई

March 28, 2026
Next Post
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टास्क फोर्ससमवेत घेतलेल्या बैठकीत झाले ‘हे’ निर्णय…

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाबाबत दिलेल्या निर्णयाबद्धल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवेदन... काय म्हणाले वाचा

ताज्या बातम्या

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

March 30, 2026
Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

March 30, 2026
SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

March 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us