Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दुर्दैवी ; कार्यक्रमानंतर उष्माघाताने ११ जणांचा मृत्यू ; १५ गंभीर

najarkaid live by najarkaid live
April 17, 2023
in राज्य
0
दुर्दैवी ; कार्यक्रमानंतर उष्माघाताने ११ जणांचा मृत्यू ; १५ गंभीर
ADVERTISEMENT
Spread the love

मुंबई, दि. १६ : खारघर येथे झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी आलेल्या शेकडो श्री सदस्यांना  उन्हाचा त्रास होऊन भोवळ आल्याच्या घटना घडल्या. त्यात ११ जणांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली.त्रास झाल्याने त्यांना रुग्णालयात हलवावे लागले मात्र दुर्दैवाने त्यातील अकरा जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

महाराष्ट्र भूषण सोहळा दरम्यान घटना 

अनेकांनी भर उन्हात कार्यक्रम ऐकला आणि नंतर थंड पाणी पिणे सरू केले. त्यातून त्यांना उष्माघाताचा त्रास सुरू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अत्यवस्थ श्री सदस्यांना कामोठे एमजीएम रुग्णालयासह खारघर मधील टाटा हॉस्पिटल व नवी मुंबई मधील वेगवगेळ्या रुग्णालयात दाखल खाण्यापिण्याची व्यवस्था केली होती, त्याच ठिकाणी नंतर त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले.मात्र ११ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला

मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख मदत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने रुग्णालयांना भेटी दिल्या. मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपये याची मदत त्यांनी जाहीर केली. जे लोक रुग्णालयात उपचार घेत आहेत त्यांच्यावरचा सर्व खर्च सरकार करेल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

उष्माघातामुळे श्री सदस्यांचा झालेला मृत्यू वेदनादायी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

खारघर येथे झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित काही श्री सदस्यांना उष्माघातामुळे रुग्णालयात हलवावे लागले. दुर्दैवाने त्यातील अकरा जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. मी या श्री सदस्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ही अतिशय वेदनादायी आणि दुर्दैवी घटना आहे. राज्य शासनातर्फे मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येणार असून रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या श्री सदस्यांचा उपचाराचा खर्च शासनामार्फत केला जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले.

कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या श्री सदस्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे रात्री आठच्या सुमारास आले होते. मुख्यमंत्र्यांनी उपचार घेत असलेल्या रुग्णांशी संवाद साधला. त्याचबरोबर तेथील डॉक्टर्ससोबत चर्चा करून उपचाराबाबत माहिती घेतली.

यावेळी माध्यम प्रतिनीधींशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, उष्माघाताचा त्रास झाल्याने श्री सदस्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. सोहळ्याच्या ठिकाणी असलेल्या डॉक्टरांनी काही श्री सदस्यांवर प्राथमिक उपचार केले. काहींना रुग्णालयात हलवावे लागले. एमजीएम रुग्णालयात दाखल असलेले रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या समन्वयासाठी पनवेल महापालिकेचा उपायुक्त दर्जाचा अधिकारी नियुक्त करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रुग्ण आणि नातेवाईकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

Spread the love
Tags: #sunstroke #उष्माघात #Ushmaghat#Heat Stroke Symptoms And Treatment
ADVERTISEMENT
Previous Post

पाचोरा तालुक्यातील शिंदाड येथील दंगलप्रकरणी धरपकड ; १५ महिलांसह ५३ अटकेत

Next Post

‘नमो आवास’ योजनेंतर्गत तीन वर्षात १० लक्ष घरे निर्माण होणार

Related Posts

ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Cabinet meeting Maharashtra

आजच्या महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे 4 धडाकेबाज निर्णय वाचा!

August 19, 2025
प्रवीणसिंह पाटील (राजपूत) बने श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के महाराष्ट्र कार्यकारी प्रदेशाध्यक्ष

प्रवीणसिंह पाटील (राजपूत) बने श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के महाराष्ट्र कार्यकारी प्रदेशाध्यक्ष

August 18, 2025
मुख्यमंत्री फडणवीस यांचा राज्यपाल राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारीबद्दल अभिनंदन

मुख्यमंत्री फडणवीस यांचा राज्यपाल राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारीबद्दल अभिनंदन

August 18, 2025
Jalgaon news : जिल्हा नियोजन मधून झालेल्या कामाचे विशेष कौतुक ;   येत्या बजेट मध्ये जिल्ह्याला निधी देणार वाढवून  – उपमुख्यमंत्री अजित पवार   

Jalgaon news : जिल्हा नियोजन मधून झालेल्या कामाचे विशेष कौतुक ;  येत्या बजेट मध्ये जिल्ह्याला निधी देणार वाढवून – उपमुख्यमंत्री अजित पवार  

August 17, 2025
Next Post
‘नमो आवास’ योजनेंतर्गत तीन वर्षात १० लक्ष घरे निर्माण होणार

‘नमो आवास’ योजनेंतर्गत तीन वर्षात १० लक्ष घरे निर्माण होणार

ताज्या बातम्या

जैन इरिगेशन आता NAAS ची कॉर्पोरेट सदस्य

जैन इरिगेशन आता NAAS ची कॉर्पोरेट सदस्य

August 28, 2025

जैन बांधवांचा ‘सामूहिक क्षमापना दिन’ साजरा!

August 28, 2025

माविम’च्या माध्यमातून बारामतीच्या महिलांकडून ४० मेट्रिक टन हिरवी मिरची दुबईला निर्यात

August 28, 2025
बालसंगोपन संस्थांतील मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी “मासूम”  : मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशील निर्णयामुळे ३,३३७ मुलांना लाभ

बालसंगोपन संस्थांतील मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी “मासूम” : मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशील निर्णयामुळे ३,३३७ मुलांना लाभ

August 28, 2025
श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमातून संपूर्ण राज्यात नागरिकांची आरोग्य तपासणी ; मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचा पुढाकार

श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमातून संपूर्ण राज्यात नागरिकांची आरोग्य तपासणी ; मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचा पुढाकार

August 28, 2025
५ हजार पदे : १० वी पास असणाऱ्यांसाठी परदेशात नोकरीची संधी!

5000 Jobs Abroad: 10 वी पाससाठी परदेशात नोकरीची सुवर्णसंधी!

August 28, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us