Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दिव्यांगांच्या सहाय्यक साहित्य खरेदी खर्चाच्या तरतुदी मध्ये वाढ ;आ.किशोर अप्पा पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

najarkaid by najarkaid
March 2, 2023
in जळगाव
0
दिव्यांगांच्या सहाय्यक साहित्य खरेदी खर्चाच्या तरतुदी मध्ये वाढ ;आ.किशोर अप्पा पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा (प्रतिनिधी) – आ.किशोर अप्पा पाटील यांनी केलेल्या सततच्या पाठपुरावा यश आले असून आमदार स्थानिक विकास योजनेअंतर्गत दिव्यांग व्यक्तींसाठी आवश्यक सहाय्यक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने निर्धारित केलेल्या कमाल खर्च मर्यादेत वाढ करण्याचा निर्णय अखेर शासनाने घेतला असून आता वार्षिक केवळ दहा लाख रुपयांऐवजी तीस लाख रुपये खर्च मर्यादा करण्यात आली असून नुकताच याबाबत शासन निर्णय निर्गमित झाला आहे.या निर्णयामुळे राज्यभरातील लाखो दिव्यांग बांधवांना आता आवश्यक सहाय्यक साहित्य उपलब्ध होणे सुलभ होणार आहे.

पाचोरा भडगाव मतदार संघात आ. किशोर अप्पा पाटील यांचे वतीने दिव्यांग बांधवांना आवश्यक सहाय्यक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा रुग्णालय जळगाव व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या तज्ज्ञांमार्फत पाचोरा व भडगाव येथे स्वतंत्रपणे दिव्यांग बांधवाच्या नोंदणीसाठी तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. यात दिव्यांग व्यक्तींना तीनचाकी सायकल, व्हील चेअर,कृत्रिम अंग व उपकरणे आदी साहित्य उपलब्धता होणार आहे.मात्र यात नोंदणी केलेल्या दिव्यांग व्यक्तींची संख्या व आवश्यक सहाय्यक साहित्यांची संख्या विचारात घेता ते शासनाने निर्धारित केलेल्या दहा लाख रुपये खर्च मर्यादेत बसणे शक्य नसल्याने यात वाढ करून सदर रक्कम किमाम तीस लाख रुपये करण्याची आग्रही मागणी आ.किशोर अप्पा पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे केली होती. दरम्यान शासनाने त्यांच्या मागणीची तात्काळ दखल घेऊन याबाबचा शासन निर्णय जाहीर करून खर्च मर्यादा दहा लाखावरून तीस लाख रुपये केली आहे.

आमदार किशोर अप्पा पाटील यांच्या या पाठपुराव्यामुळे केवळ राज्यभरातील आमदार महोदयांनाच नव्हे तर राज्यभरातील लाखो दिव्यांग बांधवांना देखील या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. दरम्यान आ.किशोर अप्पा पाटील यांनी या निर्णया बद्दल समाधान व्यक्त करत मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्यक्त केले आहेत.

पाचोरा तालुक्यातील दिव्यांगांना मिळणार लवकरच सहाय्यक साहित्य
आ.किशोर अप्पा पाटील यांनी दिव्यांग व्यक्तींसाठी आयोजित केलेल्या आवश्यक सहाय्यक साहित्य तपासणी शिबिरात नोंदणी केलेल्या भडगाव तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींना सुमारे १० लक्ष रुपयांच्या साहित्याचे यापूर्वीच वाटप झाले असून आता लवकरच पाचोरा तालुक्यातील तपासणी शिबिरात नोंदणी केलेल्या दिव्यांग बांधवांना सहाय्यक साहित्यांचे वाटप लवकरच होणार असल्याची माहिती आमदार किशोर अप्पा पाटील यांचे वतीने स्वीय सहाय्यक राजेश पाटील यांनी दिली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अभिनेत्री सुष्मिता सेनला हृदयविकाराचा झटका ; आता स्थिती कशी आहे ते जाणून घ्या

Next Post

महाराष्ट्र वन विभागात ग्रॅज्युएट्स उमेदवारांसाठी नोकरीची संधी.. 127 पदांसाठी भरती सुरु

Related Posts

कष्ट, जिद्द आणि स्वप्नांचा विजय : कोचुरचा हर्षल पाटील राज्य कर विभागात अधिकारी

कष्ट, जिद्द आणि स्वप्नांचा विजय : कोचुरचा हर्षल पाटील राज्य कर विभागात अधिकारी

April 8, 2026
जळगाव : गॅस दरवाढीविरोधात रिक्षाचालकांचा आक्रोश; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

जळगाव : गॅस दरवाढीविरोधात रिक्षाचालकांचा आक्रोश; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

April 7, 2026
Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Next Post
महाराष्ट्र बांबू विकास महामंडळात 50,000 रुपयापर्यंतच्या पगाराच्या नोकरीची संधी..

महाराष्ट्र वन विभागात ग्रॅज्युएट्स उमेदवारांसाठी नोकरीची संधी.. 127 पदांसाठी भरती सुरु

ताज्या बातम्या

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या...

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या…

April 12, 2026
Health Insurance India: HDFC ERGO कडून ‘No Limit Coverage’ हेल्थ प्लॅन लॉन्च; ₹26 प्रतिदिनात विमा!

Health Insurance India: HDFC ERGO कडून ‘No Limit Coverage’ हेल्थ प्लॅन लॉन्च; ₹26 प्रतिदिनात विमा!

April 11, 2026
IPL : 15 चेंडूत अर्धशतक! वैभव सूर्यवंशीचा स्फोटक खेळ, राजस्थानचा सलग चौथा विजय

IPL : 15 चेंडूत अर्धशतक! वैभव सूर्यवंशीचा स्फोटक खेळ, राजस्थानचा सलग चौथा विजय

April 11, 2026
School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल...

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल…

April 10, 2026
MPSC Combined Group B Bharti 2026 महाराष्ट्रात 552 पदांची भरती; अर्ज प्रक्रिया सुरू

MPSC Combined Group B Bharti 2026 महाराष्ट्रात 552 पदांची भरती; अर्ज प्रक्रिया सुरू

April 10, 2026
आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

April 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us