Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दिवाळीनंतर राज्यातील शाळा सुरू होणार !

najarkaid live by najarkaid live
November 7, 2020
in राज्य
0
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई , दि. ७; विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठीची योग्य ती खबरदारी घेऊन दिवाळीनंतर राज्यातील नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यात याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले.

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित बैठकीत मुख्यमंत्री श्री. ठाकरे बोलत होते. या वेळी शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड, राज्यमंत्री बच्चू कडू, अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, जागतिक परिस्थिती पाहता कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दिवाळीनंतर पुढचे काही दिवस अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.

ज्या शाळांमध्ये क्वारंटाईन सेंटर्स तयार करण्यात आले होते, ते सेंटर्स बंद करता येणार नाहीत. अशा ठिकाणच्या शाळा पर्यायी जागेत सुरू करता येतील का, याबाबत स्थानिक प्रशासनाने निर्णय घ्यावा.

शाळांचे सॅनिटायजेशन, शिक्षकांची कोरोना तपासणी यासारख्या सर्व बाबींची काळजी घेणे आवश्यक आहे. ज्या घरातील व्यक्ती किंवा मुले आजारी आहेत अशा पाल्यांना पालकांनी शाळेत पाठवू नये, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले आहे.

शिक्षकांची तपासणी करणार : प्रा. वर्षा गायकवाड

शाळा सुरू होण्यापूर्वी सर्व शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणी दि. १७ ते २२ नोव्हेंबरदरम्यान स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून करून घेतली जाईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी यावेळी दिली. दि.२३ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या शाळांमधे विद्यार्थ्यांचे थर्मल चेकिंग करण्यात येईल.

एका विद्यार्थ्यांला एका बेंचवर बसविण्यात येईल, एक दिवसाआड वर्ग भरतील, विद्यार्थ्यांनी घरून जेवण करून यावे, स्वत:ची पाण्याची बाटली सोबत आणावी. चार तासांची शाळा राहील त्यात केवळ विज्ञान, गणित आणि इंग्रजी असे कठीण विषय शिकवले जातील. या विषयांसह बाकी विषयांसाठी ऑनलाईन वर्गांची सुविधा असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शाळा सुरू करताना टप्प्याटप्प्याने शाळा सुरू कराव्या; तसेच शाळा व्यवस्थित सुरू राहाव्या यासाठी स्थानिक प्रशासनाला योग्य त्या सूचना देण्याची विनंती राज्यमंत्री श्री. कडू यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना केली.

शाळा सुरू करण्यासंदर्भातील सविस्तर एसओपी तयार करण्यात आली असून स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्यात येतील, असे अप्पर मुख्य सचिव श्रीमती कृष्णा यांनी सांगितले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मुख्यमंत्र्यांनी आज राज्यातील विभागीय आयुक्त,जिल्हाधिकारी यांच्याशी साधला संवाद

Next Post

चाळीसगांव तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी महसूल मंत्र्यांना दिले निवेदन

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
चाळीसगांव तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी महसूल मंत्र्यांना दिले निवेदन

चाळीसगांव तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी महसूल मंत्र्यांना दिले निवेदन

ताज्या बातम्या

Share Market Tips : आजच्या बाजारात गुंतवणूकदारांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? तज्ज्ञांचे 7 महत्त्वाचे सल्ले

March 13, 2026
Gas Booking : युद्धाचे परिणाम...फोनवरून गॅस सिलिंडर बुक होत नाही? या 3 पद्धतीने लगेच होईल बुक

Gas Booking : युद्धाचे परिणाम…फोनवरून गॅस सिलिंडर बुक होत नाही? या 3 पद्धतीने लगेच होईल बुक

March 13, 2026
Breast Cancer

धक्कादायक रिपोर्ट! जंक फूडमुळे भारतात Breast Cancer ४७८% वाढला; प्रत्येक कुटुंबाने जाणून घ्या हा धोका

March 13, 2026
शांतता आणि स्थैर्यासाठी भारत कटिबद्ध’: पश्चिम आशियातील तणावावर पंतप्रधान मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा

Mutual Fund गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी! हे 5 Ratios तपासल्याशिवाय गुंतवणूक करू नका

Jio Financial Services Share: गुंतवणुकीसाठी योग्य वेळ? ब्रोकरेजचा ‘Buy’ सल्ला, 320 रुपयांचे टार्गेट

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us