मुंबई, दि. ११ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘एसटीची सेवा पूर्ण क्षमतेने’ या विषयावर परिवहनमंत्री ॲड. अनिल परब यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून गुरुवार दि. १२ व शुक्रवार दि. १३ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल. निवेदक नरेंद्र बेडेकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.
या मुलाखतीत राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित वेतनासंदर्भात घेतलेले निर्णय, कोरोना काळात अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी करण्यात आलेली विशेष वाहतूक व्यवस्था, कोरोना रुग्णांची वाहतूक करण्यासाठी ग्रामीण तसेच शहरी भागात दिली जाणारी सेवा, सध्याच्या काळात मालवाहतुकीसंदर्भात घेतलेले महत्त्वाचे निर्णय, स्थलांतरित मजुरांना त्यांच्या राज्यात पोहोचविण्यासाठी केलेले प्रयत्न, शिक्षणासाठी विविध राज्यात असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मूळ गावी सुखरूप पोहोचविण्यासाठी केलेले प्रयत्न आणि दिवाळीनिमित्त एसटी महामंडळाकडून विशेष बससेवा सुरु करण्याबाबत घेतलेले निर्णय या संदर्भात सविस्तर माहिती परिवहनमंत्री ॲड.अनिल परब यांनी दिली आहे.













