चाळीसगाव – रुग्णाची मनोभावनाने सेवा देवून अनेक रुग्नाशी नेहमी आपुलकी आणि जिव्हाळ्याचे संबंध जोपासुन वटवृक्षासारखे छाया देणारे डॉ कर्तारसिंग परदेशी यांचा दिपकसिंग राजपुत मित्र मंडळाच्या वतीने मानपत्र देवुन सन्मान करण्यात आला .
परदेशी समाजाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रमाचे आयोजन राजपुत मंगल कार्यालयात दि १४ रोजी करण्यात आले होते. त्या कार्यक्रमात अनेक रुग्नाची पैसे असो अथवा नसो सेवा देणारे व गरीबाचा कैवारी म्हणून डॉ कर्तारसिंग परदेशी यांचा सर्वदूर नावलौकिक अशा जनसेवकाचा सन्मान दिपकसिंग राजपुत मित्र मंडळाच्या वतीने डॉ कर्तारसिंग परदेशी यांचा सपत्निक मानपत्र देवून सन्मान करण्यात आला.राजकुवर शिक्षण संस्थाचे अध्यक्ष भगवानसिंग डोभाल , परदेशी समाजाचे अध्यक्ष सुरेश परदेशी बाबंरुडचे संरपच विनोद परदेशी.सुरेश डेटवाडे भडगाव.निलेश राजपुत नागद.सुभाष दादा महाजन नागद.ईदल भाऊ परदेशी शिदाड.भगवान महेर जामडी रायसिग परदेशी पोलिस पाटील जामडी. शरद परदेशी.विनोद सर नागद.निलेश राजपुत. भगतसिंग परदेशी.सतिश परदेशी लोहटार. दिपकसिंग राजपुत मित्र मंडळाचे अध्यक्ष दिपक राजपुत यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी समाज बांधव व दिपकसिंग राजपुत मित्र मंडळाचे सदस्य उपस्थित होते.