पारोळा ;- तालुक्यातील सावखेडा होळ येथे आज १६ रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास इंद्रदेव महाराज आश्रम येथे दोन महिलांना दागिने चोरत असल्याच्या कारणावरून पोलिसांनी अटक केली .
गुरुपौर्णिमा निमित्त दर्शनासाठी आलेल्या भाविकांची गर्दी झालेली असतांना याचा फायदा घेवुन गर्दीत महिलांची गळ्यातली पोत चोरी करत असताना चोरी करणा-या दोन महिलेस पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे यांचे मार्गदर्शनाने पो.काँ. पंकज राठोड व सुनिल साळुंखे यांनी रंगेहाथ पकडले. लागलीच त्यांची अंगझडती बंदोबस्तवरील महिला पोलीस कर्मचारी ज्योती चव्हाण व संगीता मोरे यांनी घेतली असता त्यांचे कडे २ सोन्याच्या पोत व १ सोन्याची चैन अश्या वस्तु पोलीसांनी हस्तगत केल्या आहेत . पुढील अधिक तपास पोलीस निरीक्षक .लिलाधर कानडे यांचे मार्गदर्शनाने पो.हे.काँ.प्रकाश चौधरी पो.काँ. पंकज राठोड व सुनिल साळुंखे करीत आहेत.