चाळीसगाव,(किशोर शेवरे) – तळेगाव ग्रामपंचायतीच्या अंतर्गत असलेले कृष्णा नगर तांडा येथील बंजारा समाजाच्या विकासासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिलो आहे. गाव करील ते राव काय करील या उक्तीप्रमाणे सर्वांनी एकत्र मिळून राजकारणाच्या पलीकडे जाऊन गावाच्या विकासासाठी एकजूट कायम ठेवली पाहिजे. सरपंच सारिका संतोष राठोड यांच्या माध्यमातून या गावात विविध विकास कामे होत आहेत. राजकारणाच्या पलीकडे जाऊन बंजारा समाजाशी माझी वेगळी भावनात्मक नाळ जोडली गेली आहे. लोकसभा मतदारसंघातील दोनशे तांड्यांचा माझ्या पाठीशी भक्कम आशीर्वाद राहिला आहे. त्यांच्या प्रेमातून तांड्यांचा चौफेर विकासाचा प्रयत्न केला आहे.चाळीसगाव तालुक्यातील तांड्यांचा विकासासाठी गेल्या पाच वर्षांत सर्वतोपरी मदत केली. अनेक तांड्यांचे विभाजन करून अधिक विकासासाठी चालना दिली.
गोरगरीब तांड्यातील जनतेसाठी सदैव विकासाचे मार्ग खुले केले. उज्वला गॅस योजना असो की संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून लाभ देण्याचा प्रयत्न केला. गोरगरीब या शब्दात आधी गोर येतो याची जाणीव मला कार्यकर्त्यांनी नेहमी करून दिले आहे. गोर समाजाच्या माध्यमातून सदैव विकासाची झुकते माप बंजारा समाजाला देत राहिलो यापुढे देखील अतिशय कष्टाळू मेहनती असलेला माझ्या बंजारा समाजाच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहील अशी ग्वाही खासदार उन्मेश दादा पाटील यांनी आज तळेगाव कृष्णानगर येथे विविध कामांच्या लोकार्पण प्रसंगी दिली.
तळेगाव येथे आज सकाळी अकरा वाजता साडेसात लाख रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या स्मशानभूमीचे लोकार्पण ,दलित वस्तीअंतर्गत बस स्टॅन्ड जवळील साडेचार लाखांच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण, हातगाव ते राम मंदिर कृष्णा नगर तीन लाख रुपयांच्या रस्त्याचे लोकार्पण, सात लाख राम मंदिर सभामंडपाची लोकार्पण अशा विविध विकास कामांचे उद्घाटन आज उन्मेश दादा पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी व्यासपीठावर सरपंच सारिकाताई राठोड ,तळेगाव ज्येष्ठ मार्गदर्शक सुभाष मामा शेलार , ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र काका जैन,सरपंच संघटनेचे डॉ. महेंद्र राठोड, योजना मित्र दिनकर राठोड, प्राणिमित्र इंदलदादा चव्हाण,दीपकभाऊ पाटील, संतोषभाऊ राठोड, दत्तूभाऊ नागरे,माजी सरपंच गोरखभाऊ राठोड, निलेशभाऊ पाटील, अनिल चव्हाण, भाऊसाहेब चव्हाण, चेतन देशमुख, सरदार राठोड,महेश शिंदे,गुणवंत शेलार, माणिकराव शेलार,प्रकाश चव्हाण,तुळशीदास राठोड,बिपिन चव्हाण, अर्जुन चव्हाण,भाऊसाहेब चव्हाण अनिल राठोड यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ, पत्रकार आदी मान्यवर उपस्थित होते. सुरुवातीला सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. खासदार उन्मेश दादा पाटील पुढे म्हणाले की बंजारा समाजाच्या विकासासाठी चाळीसगाव तालुक्यातील अनेक
तांड्यांचे विभाजन करून त्यांना महसुली दर्जा दिला आज बंजारा समाजाचे तरूण सरपंच पदाधिकारी यांनी विकासासाठी सदैव माझ्याकडे पाठपुरावा सुरू ठेवला त्यातून आज जिल्ह्यातील सर्वाधिक सक्षम विकासाकडे वाटचाल करणारी तांडे चाळीसगाव तालुक्यात दिसून येत आहेत. तांड्यांच्या विकासासोबत समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केला.आणि बंजारा तांड्यांचा
विकासाचा अनुशेष भरून काढला. बंजारा समाजाचे प्रेम बघून समाजाचा उतराई होण्याचा मी नेहमी प्रयत्न करत असतो. समाजकारणातून राजकारणाची सुरुवात करतांना सहा सात वर्षांपूर्वी याच ठिकाणी डोळ्यांच्या शिबिर देखील याच ठिकाणी भरवून समाजातील गोर गरीब जनतेला मदत केली.समाजाच्या भल्यासाठी जे जे प्रयत्न करता येतील त्यासाठी मी सदैव प्रयत्नशील असल्याची प्रांजळ भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी शिंदीचे माजी सरपंच गोरख राठोड यांनी प्रास्ताविक तर चेतन देशमुख यांनी आभार व्यक्त केले.सुभाष मामा शेलार यांनी यावेळी तळेगाव ग्रामपंचायतचे विभाजन करून कृष्णनगर नवीन ग्रामपंचायतीचे निर्मिती करावी.अशी मागणी खासदार उन्मेश दादा पाटील यांच्याकडे केली. याप्रसंगी खासदार उन्मेशदादा पाटील यांचा सत्कार सरपंच सारिका राठोड व ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीने करण्यात आला.