Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

तब्बल ६० दिवसाच्या प्रदीर्घ लढ्यानंतर सुजित विसपुतेंची कोरोनावर मात

najarkaid by najarkaid
November 5, 2020
in जळगाव
0
तब्बल ६० दिवसाच्या प्रदीर्घ लढ्यानंतर सुजित विसपुतेंची कोरोनावर मात
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव - डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात अंत्यंत गंभीर अवस्थेत कोरोनाबाधित रुग्ण २ सप्टेंबर रोजी उपचारार्थ दाखल झाला होता. कोरॅड स्कोअर हा अत्यंत वाढलेला असल्याने त्यांना तब्बल २५ दिवस व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले. डॉ.पाटील रुग्णालयातील तज्ञांनी केलेले उपचार आणि रुग्णाने दिलेल्या प्रतिसादामुळे मंगळवार, ३ नोव्हेंबर रोजी रुग्णाला तब्बल दोन महिन्यानंतर डिस्चार्ज देण्यात आला. याप्रसंगी रुग्णासह कुटूंबियांच्या चेहर्‍यावर समाधान दिसून आले असून रुग्णालयाने दिलेल्या अहोरात्र सेवेबद्दल त्यांनी आभार मानले.  
जळगाव शहरातील पिंप्राळा येथील रहिवासी सुजित विसपुते (वय ४८) ह्यांना गणेशोत्सव काळात अचानक त्रास जाणवायला लागला. उपचारासाठी ते जळगावातील काही खासगी दवाखान्यात दाखल झाले. मात्र बरे न वाटल्याने त्यांनी डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात धाव घेतली. २ सप्टेंबर २०२० रोजी रुग्ण सुजित विसपुते यांना डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले. अत्यंत गंभीर अवस्थेत रुग्ण असल्याने तात्काळ कोरोना टेस्ट व सीटी स्कॅन करण्यात आला, रिपोर्टनुसार ४० पैकी ३२ इतका सीटी सेव्हरिटी स्कोर आला. कोरॅड स्कोर अधिक असल्याने रुग्णाच्या जिवीताला धोका निर्माण होण्याची शक्यता होती. मात्र डॉ.उल्हास पाटील रुग्णालयातील तज्ञांच्या टिमने त्यांच्यावर केलेल्या उपचारामुळे विसपुते यांची प्रकृती सुधारण्यात यश आले.  
सदर रुग्णाच्या प्रकृतीनुसार त्यांना कोविड आणि नॉन कोविड अशा दोन्ही ठिकाणी उपचारासाठी ठेवण्यात आले. त्यावेळी रुग्णालयातील हृदयरोग तज्ञ डॉ.वैभव पाटील, डॉ.केतकी पाटील, डॉ.पाराजी बाचेवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षीत नर्सिंग स्टाफ यांनी उपचार केले. 
आयसीयुमध्ये २५ दिवस दिला लढा 
रुग्ण सुजीत यांची प्रकृती अतिशय खराब असल्याने त्यांना आयसीयुमध्ये दाखल करण्यात आले होते. एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल २५ दिवस आयसीयुमध्ये ते होते. डॉक्टरांचे उपचार आणि आयुष्याची दोरी मजबूत असल्याने तब्बल पंचवीस दिवस सुजीत यांनी जीवनमरणाशी लढा दिला. त्यांच्या प्रकृतीतील सुधारणा बघता त्यांना नॉर्मल वॉर्डात दाखल करण्यात आले. त्यावेळीही त्यांना तब्बल ३० दिवस ऑक्सीजन लावण्यात आला. अखेरीस दहा दिवस त्यांचा ऑक्सीजनचे प्रमाण कमी करण्यात आले. दोन महिने सातत्याने उपचार घेतल्यावर प्रकृती आता धोक्याच्या बाहेर असून इन्फेक्शन देखील दूर झाल्याचे निष्पन्न झाल्यावर रुग्णालय प्रशासनाने सुजीत विसपते यांना डिस्चार्ज दिला. 
रुग्णालयाने दिले जीवनदान - मयूर विसपुते 
गणपती उठल्याच्या दुसर्‍या दिवशी वडिलांची प्रकृती गंभीर झाली होती. उपचाराकरीता आम्ही रुग्णालयात आलो. वडिलांच्या गंभीर प्रकृतीची दखल घेत तात्काळ उपचारासाठी दाखल करुन घेण्यात आले. वडिलांना २५ दिवस आयसीयूमध्ये ठेवण्यात आले. त्यानंतर कोविड रुग्णालयात ठेवले, येथील डॉक्टरांसह प्रशिक्षीत नर्सिंग स्टाफने वेळोवेळी आवश्यक ते उपचार केले. अर्ध्यारात्री सुद्धा त्रास होतोय सांगितल्यावर सर्व धावून यायचे, वडिलांसोबत मी कायम रुग्णालयातच राहिलो. आज त्यांची प्रकृती पूर्णत: बरी झाली असून डॉक्टरांनी सुट्टी मंजूर केली. आज खुप छान वाटत आहे रुग्णालयाने माझ्या वडिलांना जीवनदान दिले. आज घरी जात असल्याने कुटूंबिय देखील आतुरतेने वाट पाहत असल्याचे रुग्ण सुजीत विसपुते यांचा मुलगा मयूर विसपुते याने सांगितले

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पाचोरा ; पोलीस निरीक्षक नजन पाटील यांनी स्वीकारला पदभार !

Next Post

चाळीसगाव तालुक्यातील भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी पक्षात प्रवेश !

Related Posts

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Suicide Case |  पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या ; कारण अद्याप गूढ

Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

March 28, 2026
Next Post
चाळीसगाव तालुक्यातील भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी पक्षात प्रवेश !

चाळीसगाव तालुक्यातील भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी पक्षात प्रवेश !

ताज्या बातम्या

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

March 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us