- चाळीसगाव- बकरी ईद निमित्त भारतरत्न महामहिम डाॕ.ए.पी.जे.आब्दुल कलाम फाऊंडेशनच्या पदाधि-यांनी कोल्हापुर व सांगली जिल्ह्यातील पुरग्रस्तांच्या दुखाःत सहभागी होण्यासाठी सोशल मिडियावर मदतीसाठी आवाहन केले होते,त्याला भरघोस प्रतिसाद मिळुन आज ईदगाह मैदानावर वस्तु व रोख रक्कम जमा करण्यात आली.
त्यात प्रामुख्याने हाजी गफुर पहेलवान(५० किलो तांदूळ),आजिज खाटीक(पेस्ट,तेल,बिस्किट बाॕक्स),अय्युबभाई बिर्याणी(सोया तेल २० पॕक),डाॕ.जावेदशेख(औषधी व मेडिकल किट),विनोद अग्रवाल(सोया तेल २० पॕक,निरमा साबण बाॕक्स,गहु कट्टा,पारले बिस्किट ४४पॕक)अॕड.समीर शेख(पारले१०० पॕक),वसिम बागवान(५० किलो साखर),दिलीप जाने(१० पॕक पोहे),बालाप्रसाद राणा(साबण,चहा,फिनाईल),जितेंद्र वरखेडे(३० किलो गहु),जावेद बागवान(फ्रुटस् व चटाई),चैताली स्वीट्स(टुथ ब्रश दोन पॕक),खलिल पिंजारी(१० पॕक पोहे),मनोज अग्रवाल(१० शर्टस व कपडे)या दात्यांनी दिले,यावेळी चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे सचिव डाॕ.विनोद कोतकर,डी.वाय.एस.पी.श्री.उत्तमराव कडलग,पोलीस निरिक्षक श्री.विजयकुमार ठाकुरवाड,स.निरिक्षक श्री.सुरेश शिरसाठ,श्री.आर.डी.चौधरी,श्री.अनिल निकम,श्री.रमेश शिंपी,हाजी गफुर पहेलवान,असलम मिर्झा,अजिज मन्सुरी,रफिक मनियार,अनिस मिर्झा,राजु शेख,छोटु पहेलवान,खलिल शेख उपस्थित होते,मदत जमा करण्यासाठी फाऊंडेशनचे अध्यक्ष अजिज खाटीक,सचिव सरदार शेख व पदाधिकां-यानी परिश्रम घेतले.