चाळीसगाव – तालुक्यातील टाकळी प्र चा येथील तितुर नदीपात्रातील गावठी दारु तयार करण्याची भट्टी चाळीसगाव शहर पोलीसांनी दि २१ रोजी सायंकाळी ६-३० वाजेच्या सुमारास छापा मारुन उध्वस्त केली असुन महीलेला ताब्यात घेवुन कारवाई करण्यात आली आहे.
टाकळी प्र चा शिवारातील तितुर नदीपात्रात गावठी दारु भट्टी सुरु असल्याची गोपनीय माहिती निरीक्षक विजय ठाकुरवाड यांना मिळाल्यावरुन त्यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार बापुराव भोसले, पोलीस नाईक राहुल पाटील, विजय शिंदे, अभिमन पाटील, पो कॉ तुकाराम चव्हाण, गोपल बेलदार, संदीप पाटील, गोवर्धन बोरसे यांनी दि २१ रोजी सायंकाळी छापा मारुन ११२५० रुपये किमतीचे १५ लोटरचे १५ डब्बे त्यात ४५० लिटर गुळ, मोह, नवसागर मिश्रीत गावठी दारुचे कचे रसायन, २५०० रुपये किमतीचे १०० लिटर उकळते रसायन, १७०० रुपये किमतीची ३५ लिटर तयार गावठी दारु, १००० रुपये किमतीचे ॲल्युमिनीअमची तगारी व साहीत्य ताब्यात घेवुन जागेवर नाश केले तर टाकळी प्र चा येथील ४५ वर्षीय महीलेला ताब्यात तिचेवर चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला पो कॉ तुकाराम चव्हाण यांच्या फिर्यादीवरुन महाराष्ट्र प्रोव्हीशन कायदा कलम ६५ (फ), (ई) प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.