जळगाव – वैयक्तिक सुरक्षा, मालमत्ता संदर्भातील वाद, परिवाराकडून होणारा छळ, बॅँक, कोषागार व रेशन यासारख्या अनेक संकटे व अडचणींना ज्येष्ठ नागरिकांना सामोरे जावे लागते. या ज्येष्ठ नागरिकांना संकटे, अडचणींचा सामना करावा लागू नये, त्यांचे आयुष्य सुखकर व्हावे, यासाठी पोलीस विभागाने आवश्यक पावले उचचली आहेत. यानुसार या ज्येष्ठ नागरिकांचय मदतीसाठी नियंत्रण कक्षात 1090 या हेल्पलाईन क्रमांक राहणार असून 24 तास ही सुविधा उपलब्ध राहणार आहे. तसेच प्रत्येक पोलीस स्टेशन स्तरावर ज्येष्ठ नागरिक सुरक्षा समितीची स्थापना करण्यात येणार असून ज्येष्ठ नागरिक कक्ष स्थापन करण्यात येणार आहे.















