Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जैन इरिगेशनचा क्रिकेट संघ अंतिम विजेता ; मुंबईच्या टाईमशील्ड स्पर्धेच्या ‘अ’ गटात अव्वल, मुंबई कस्टम्स संघावर मात 

najarkaid by najarkaid
March 29, 2024
in जळगाव
0
जैन इरिगेशनचा क्रिकेट संघ अंतिम विजेता ; मुंबईच्या टाईमशील्ड स्पर्धेच्या ‘अ’ गटात अव्वल, मुंबई कस्टम्स संघावर मात 
ADVERTISEMENT

Spread the love

जैन इरिगेशनचा क्रिकेट संघ अंतिम विजेता

मुंबईच्या टाईमशील्ड स्पर्धेच्या ‘अ’ गटात अव्वल, मुंबई कस्टम्स संघावर मात

जळगाव, दि.२९ (क्रीडा प्रतिनिधी) –  भारतातील अग्रगण्य मानली जाणारी मुंबई क्रिकेट असोसिएशन आयोजित आंतरकार्यालयीन ‘अ’ गट स्पर्धेचा अंतिम सामना जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. विरूद्ध मुंबई कस्टम्स यांच्या दरम्यान दि. २७, २८, २९ मार्च २०२४ रोजी मुंबई स्थित बांद्र-कुर्ला संकुलाच्या मैदानावर खेळला गेला.

मुंबई कस्टम संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्र रक्षण करण्याचा निर्णय घेतला, आपल्या कर्णधाराचा निर्णय सुयोग्य ठरवताना मुंबई कस्टम संघाने अप्रतिम गोलंदाजी करीत जैन इरिगेशन संघाला १४५ धावांत रोखले. यात जयस्वाल याने ४० धावात ५ बळी, तर चव्हाण याने ३२ धावात ४ बळी मिळवीले. जैन संघाचा आघाडीचा फलंदाज शाश्वत जगताप याने सर्वाधिक ४९ धावा केल्या. त्याला राॅयस्टन डायस याने २१ धावांचे योगदान दिले.

१४५ धावांचा पाठलाग करणारा मुंबई कस्टम संघ फलंदाजीत विशेष चमक दाखवू शकला नाही. जैन संघातील जळगावचा खेळाडू शशांक अत्तरदे याने अत्यंत भेदक अशी ऑफस्पीन गोलंदाजी करताना मुंबई कस्टम संघाच्या फलंदाजीला खिंडार पाडीत केवळ ३७ धावांत ७ बळी मिळविल्या. तर जळगावच्याच जगदिश झोपे याने सुद्धा २ महत्त्वपुर्ण बळी मिळवीत शशांक याला उत्तम साथ दिली व मुंबई कस्टम संघाला १२५ धावांवर गुंडाळून २० धावांची महत्त्वपुर्ण आघाडी घेतली.

आपल्या दुसऱ्या डावात फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेत जैन संघाचा कर्णधार जय बिस्टा याने नाबाद २०१ धावा केल्या. तर सुवेद पारकर याने ११२ धावांचे योगदान दिले. व जैन इरिगेशन संघाने एकुण ३ बाद ३७९ धावांवर आपला डाव घोषित केला.

मुंबई कस्टम्स संघाने आपला पराभव मान्य करीत हा अंतिम सामना जैन इरिगेशन संघाला बहाल केला.

जैन इरिगेशन संघ खालीलप्रमाणे –

१) जय बिस्टा २) शाश्वत जगताप ३) मनन भट ४) सुवेद पारकर ५) आयुष झिमरे ६) साईराज पाटील

७) राॅयस्टन डायस ८) विजय गोयील (सर्व मुंबई) ९) सुरज शिंदे (पुणे)

१०) शशांक अत्तरदे ११) जगदिश झोपे (जळगाव)

प्रशिक्षक – १) समद फल्ला (पुणे), २) अनंत तांबवेकर (सांगली)

मार्गदर्शक – मयंक पारिख (मुंबई)

चाैकट –

जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. या कंपनीने  खेळाडूंना सदैव पाठबळ देण्याचे धोरण राबविले आहे. क्रीडापटुंना हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी कंपनीद्वारे अनेक वर्षांपासून आपला क्रिकेट संघ मुंबईतच नव्हे तर राष्ट्रीय पातळीवर अत्यंत मानाच्या समजल्या जाणाऱ्या ‘टाईमशील्ड’ या आंतर कार्यालयिन क्रिकेट स्पर्धेत २०१० पासून सातत्याने सहभागी होत आहे. मागील काही वर्षांपासून या संघाचा समावेश ‘अ’ गटात झालेला आहे. आजपावेतो या संघाने सन २०१४ व आता २०२४ मध्ये ‘अ’ गटाच्या अंतिम सामन्यात विजय मिळवित दुसऱ्यांदा टाईमशील्ड चषक आपल्या नावे केला आहे. संघातील सर्व खेळाडूंचे प्रशिक्षक यांचे हार्दिक अभिनंदन करताना विशेष अभिमान व आनंद वाटत आहे. आमची कंपनी सर्वच प्रकारच्या खेळांना व खेळाडूंना आपला सक्रिय पाठिंबा देत आली आहे व भविष्यात देखील खेळाडूंच्या उन्नतीसाठी कटिबद्ध राहू याची ग्वाही पण या विशेष प्रसंगी देतो.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शिरसोली येथे शिवजयंती मिरवणूकीवर दगडफेक ; ५ ते ६ जखमी, पोलिस घटनास्थळी दाखल, परिस्थिती नियंत्रणात

Next Post

जिल्ह्यातील सहाय्यकारी मतदान केंद्राच्या प्रस्तावास निवडणूक आयोगाची मान्यता प्रदान ; जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची माहिती

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

March 22, 2026
Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

March 22, 2026
बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
Next Post
मुदतीत कामं पूर्ण न केल्यास ठेकेदार काळ्या यादीत जातील ; जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचा इशारा

जिल्ह्यातील सहाय्यकारी मतदान केंद्राच्या प्रस्तावास निवडणूक आयोगाची मान्यता प्रदान ; जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची माहिती

ताज्या बातम्या

Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

March 23, 2026
तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.”, भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा उघडकीस

तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.”, भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा उघडकीस

March 23, 2026
Western Railway Recruitment 2026

Western Railway Recruitment 2026 | 10वी पास उमेदवारांसाठी 5349 जागांची मोठी भरती

March 23, 2026
Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

March 23, 2026
Adulterated Milk Deaths

Adulterated Milk Deaths : भेसळयुक्त दूध पिल्याने 16 जणांचा मृत्यू

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us