जळगाव- जी. एच. रायसोनी महाविदयालयाचे ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभाग उत्कृष्ट नियोजन करीत विद्यार्थ्यांच्या विविध तांत्रिक सॉप्ट स्किल्सवर विशेष भर देऊन मुलांना रोजगारक्षम बनविण्यात महत्वाची भुमिका बजावत आहे. मागील काळात विविध क्षेत्रात लागणार्या विशेष कौशल्याची नोंद घेत महाविदयालयातील तसेच उदयोग क्षेत्रातील तज्ञांचे प्रशिक्षण घेण्यात आले़.
याचाच परिणाम म्हणुन नुकत्याच झालेल्या ता. ५ नोव्हेंबर रोजीमुथूट मायक्रो फायनान्स, हेफशाईन सॉफ्टवेअर, उत्कर्षा बँक, टेक महिंदा या कंपनीच्या खुल्या परिसर मुलाखतीत जी. एच. रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविध्यालयाच्या २० विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. सदर परिसर मुलाखतीत महाविध्यालयातील एमबीए, बीबीए, बीसीए, बीई च्या एकूण ७५ विध्यार्थ्यानी सहभाग नोंदविला होता.यावेळी अॅप्टीटयुड टेस्ट, ग्रुप डिक्सशन, व्येयक्तिक मुलाखती आदी माध्यमातून विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली़. तसेच निवड झालेल्या विद्यार्थ्यांना क्रेडीट ऑफिसर, ब्रांच मॅनेजर या विविध विभागामध्ये संधी मिळाली तसेच निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ऑफर लेटर देण्यात येणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक प्रितम रायसोनी, संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल व रायसोनी अभियांत्रिकी महाविध्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. जी. मॅथ्यू यांनी अभिनंदन केले़. तर परीसर मुलाखत यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागाचे प्रमुख प्रा़ पंकज पाटील, प्रा. हर्षद पाटील व प्रा. तन्मय भाले यांनी परिश्रम घेतले.















