Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्ह्यात उद्यापासून बालिका सप्ताह

najarkaid live by najarkaid live
January 19, 2020
in जळगाव
0
जिल्ह्यात उद्यापासून बालिका सप्ताह
ADVERTISEMENT

Spread the love

सप्ताहांतर्गत 20 ते 26 जानेवारीपर्यंत कार्यक्रम

जळगाव – जिल्ह्यात मुलींचे प्रमाण वाढावे याकरीता ज्या कुटूंबाला एक किंवा दोन मुली आहेत. अशा कुटूंबाचा सत्कार करण्यात यावा. तसेच ज्या गावात मुलींची संख्या जास्त आहे, अशा ग्रामपंचायतींचा सत्कार करण्यात यावा अशा सुचना जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी आज दिल्यात. दरम्यान उद्या दि. 20 पासून जिल्ह्यात राष्ट्रीय बालिका दिनानिमीत्त विशेष सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.  

केंद्र शासनाच्या सुचनेनुसार बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियानातंर्गत येत्या 20 ते 26 जानेवारी या कालावधीत राष्ट्रीय बालीका दिनानिमित्ताने विशेष सप्ताहाचे आयोजन करण्यात येत आहे. या अभियानातंर्गत राबवावयाच्या उपक्रमांची नियोजन आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न् झाली, यावेळी त्यांनी वरीलप्रमाणे सुचना दिल्यात. या बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजयसिंग परदेशी, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलींद दिक्षित, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पाटोळे, जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणचे सचिव श्री. ठोंबरे, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी बी. ए. बोटे, जिल्हा परिषदेचे महिला व बालविकास अधिकारी श्री. तडवी यांचेसह जिल्ह्यातील सर्व बालविकास अधिकारी उपस्थित होते. यावेळी डॉ. ढाकणे म्हणाले की, राष्ट्रीय बालीका सप्ताहानिमित्ताने जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यक्रमांचे आयोजन करावे. तसेच जिल्ह्यात मुलींचा जन्मदर वाढण्यासाठी नागरीकांमध्ये जनजागृती होण्यासाठी सामाजिक संस्थाची मदत घ्यावी.

राष्ट्रीय बालीका सप्ताहानिमित्ताने जिल्ह्यात 20 जानेवारी रोजी जिल्हा व तालुकास्तरावर स्वाक्षरी मोहिम राबविणे तसेच शपथ घेण्याचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. 21 जानेवारी शाळा, महाविद्यालयांमध्ये बेटी बचाओ, बेटी पढाओबाबत रॅली व प्रभात फेरीचे आयोजन, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका यांच्याव्दारे दारोदार योजने प्रसिध्दी, घरांवर तसेच शासकीय कार्यालयांच्या दारांवर योजनेचे पोस्टर्स चिटकवणे. 22 जानेवारी रोजी स्लोगन, पेंटींग, चित्रकला, एकांकिका, निबंध, रांगोळी स्पर्धांचे शाळा, महाविद्यालयांमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करणे. बेटी बचाओ, बेटी पढाओ यावर आधारीत सार्वजनिक ठिकाणी, शाळेच्या भिंतीवर भित्तिचित्र स्पर्धां घेणे. 23 जानेवारी रोजी बेटी बचाओ, बेटी पढाओवर आधारित सामाजिक बैठक घेणे, धार्मिक, सामाजिक प्रतिनिधी यांच्यामार्फत संवेदनशील विषयावर कार्यक्रम घेणे. गुडटच, बॅडटच याबाबत शालेय विद्यार्थ्याशी संवाद साधणे. 24 जानेवारी रोजी बेटी बचाओ, बेटी पढाओ वर आधारित चित्रपुस्तिका प्रकाशीत करणे,पथनाट्याचे आयोजन करणे. चित्रपट, पपेट शो चे आयोजन करणे. जिल्हा व ग्रामीण स्तरावर मुलींच्या जन्माचे स्वागत करणे, मुलीच्या नावे झाडे लावणे. 25 जानेवारी रोजी मुलींचे लिंग गुणोत्तर व बालकांची काळजी विषयावर विशेष ग्रामसभेचे आयोजन करणे. आरोग्य व पोषण तसेच पीसीपीएनडीटी विषयावर व्याख्याने, कार्यशळा आयोजित करणे. आणि 26 जानेवारी रोजी जिल्ह्यातील मुलींची संख्या जास्त असणार्‍या ग्रामपंचातींचा सत्कार करणे असे कार्यक्रम घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा महिती ब बालविकास अधिकारी श्री. परदेशी यांनी बैठकीत दिली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

फळपीक विमा योजनेत शेतकर्‍यांची फसवणूक

Next Post

वढोदा वनक्षेत्रात अवैध वृक्षतोड; कारवाईत 17 महिलांना अटक

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

January 7, 2026
दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
वढोदा वनक्षेत्रात अवैध वृक्षतोड; कारवाईत 17 महिलांना अटक

वढोदा वनक्षेत्रात अवैध वृक्षतोड; कारवाईत 17 महिलांना अटक

ताज्या बातम्या

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

February 27, 2026
तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

February 26, 2026
एकदा फिचर्स पहाच! सुरक्षा, स्पीड आणि स्टाईलसह Samsung Galaxy S26 Ultra लाँच – AI पॉवर आणि 200MP कॅमेराचा धमाका!

एकदा फिचर्स पहाच! सुरक्षा, स्पीड आणि स्टाईलसह Samsung Galaxy S26 Ultra लाँच – AI पॉवर आणि 200MP कॅमेराचा धमाका!

February 26, 2026
Tata Share Price Today: आज टाटा शेअर्समध्ये तेजी की दबाव?

Tata Share Price Today: आज टाटा शेअर्समध्ये तेजी की दबाव?

February 26, 2026
SIM-Binding Rules India कायम! राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य , काय आहे नियम जाणून घ्या!

SIM-Binding Rules India कायम! राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य , काय आहे नियम जाणून घ्या!

February 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us