Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय मदत जाहीर

नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या बॅक खात्यात लवकरच जमा होणार रक्कम

Editorial Team by Editorial Team
October 6, 2021
in जळगाव
0
केंद्राच्या ‘या’ 5 योजना शेतकर्‍यांसाठी आहेत मोठ्या कामाच्या ; जाणून घ्या कोणत्या आहेत?
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव :- यंदाच्या मार्च ते मे महिन्याच्या दरम्यान अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वा-यामुळे बाधीत झालेल्या शेतकर्‍यांसाठी राज्य शासनाने मदत जाहीर केली असून राज्यात सर्वाधिक ३५ कोटी ३५ लाख रूपयांची मदत ही जळगाव जिल्ह्यास जाहीर करण्यात आली आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. आज याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून लवकरच शेतक-यांच्या बँक खात्यात नुकसान भरपाई जमा करण्यात येणार आहे.

यंदाच्या मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसामुळे पिकांसह फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यामुळे आपत्तीग्रस्त शेतकर्‍यांसाठी राज्य मंत्रीमंडळाच्या १२ मे, २०२१ रोजी झालेल्या बैठकीत मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. राज्यातील कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर येथील विभागीय आयुक्तांकडून १२२ कोटी २६ लाख ३० हजार रूपयांच्या नुकसान भरपाईचे प्रस्ताव सादर केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला होता.

या अनुषंगाने आज राज्य मंत्रीमंडळाच्या उपसमितीने या मदतीच्या रकमेला मंजुरी दिली आहे. यात केंद्रीय आपत्ती प्रतिसाद निधी (एनडीआरएफ) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद निधी ( एसडीआरएफ) दरानुसार मदत अनुज्ञेय करून सर्व विभागीय आयुक्तांनी सादर केलेल्या विवरणानुसार ही मदत प्रदान करण्यात येणार असून आज याबाबतचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. आजच्या शासन निर्णयातील सर्वात लक्षणीय बाब म्हणजे यात राज्यात सर्वात जास्त म्हणजे ३५ कोटी ३५ लाख ३१ हजार रूपये इतकी रक्कम ही जळगाव जिल्ह्यास मिळणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

जळगाव जिल्ह्यातील शेतकर्‍यांना यंदा निसर्गाचा मोठ्या प्रमाणात फटका बसल्यामुळे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीत शेतकर्‍यांना मदत देण्याबाबतचा प्रश्‍न उपस्थित केला होता. याची दखल घेऊन जिल्ह्यास भरीव मदत जाहीर करण्यात आली असून याचा जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना लाभ होणार आहे.

शासन निर्णयानुसार पीक आणि फळबागांचे ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना या मदतीचा लाभ होणार आहे. या संदर्भात तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहायकांची संयुक्त स्वाक्षरी असणारे पंचनामे ग्राह्य धरून संबंधीत शेतकर्‍यांना ही मदत त्यांच्या बँक खात्यामध्ये जिल्हा प्रशासनाकडून थेट जमा करण्यात येणार आहे. प्रशासनाने कोणत्याही प्रकारे शेतकर्‍यांना रोख रक्कम देऊ नये, तसेच बँकांनी यातून कोणत्याही प्रकारची कपात करू नयेत असे स्पष्ट निर्देशही या शासन निर्णयात देण्यात आले आहेत.

पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, मार्च ते मे महिन्यातील अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे आधीच पंचनामे करण्यात आलेले असून त्यातील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना लवकरच मदत मिळणार आहे. याप्रमाणेच अलीकडच्या काळात झालेल्या अतिवृष्टीग्रस्तांनाही राज्य शासनाकडून आपण मदत मिळवून देण्यासाठी कटीबध्द असल्याचे त्यांनी सांगितले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जाणून घ्या अधिक पनीर खाण्याचे ‘हे’ दुष्परिणाम देखील, शरीरावर असा होऊ शकतो परिणाम

Next Post

गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या ; कोळवद येथील घटना

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
Next Post
वसंतवाडी येथील शेतमजूराने घेतला गळफास

गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या ; कोळवद येथील घटना

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us