जळगाव,9 – महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केद्र, जळगाव या कार्यालयातील Receipt for payment to Government शासनास केलेल्या प्रदानाची पावती हे पुस्तक जळगाव येथे दि 10 फेब्रुवारी, 2020 ते 15 फेब्रुवारी,2020 या कालावधीत गहाळ झालेले आहे. या संदर्भात या कार्यालयाचे श्री मकरंद रामचंद्रराव सरकटे, उद्योग निरीक्षक यांनी जिल्हापेठ, पोलिस स्टेशन जळगाव, या कार्यालयात पहिली खबर (First information Report) दि. 16 फेब्रुवारी, 2020 रोजी लेखी नोंदणी केलेली आहे.
या कार्यालयातील नोंदीनुसार पावती पुस्तक क्र. 4091401 ते 4091564 पर्यंतच्या वापरलेल्या पावत्या आहेत. व क्र. 4091565 ते 4091600 पर्यंतच्या न वापरलेल्या 36 पावत्या आहेत. जिल्हापेठ, पोलिस स्टेशन, जळगाव यांच्याकडील FIR क्र. 0135/2020 दि. 16 फेब्रुवारी, 2020 या कार्यालयास लेखी प्राप्त झालेला आहे. सदर पवती पुस्तक कोणाला सापडल्यास तात्काळ महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, जळगाव यांचेकडे जमा करावे.
सदर पावती पुस्तक गहाळ झालेले असलेबाबतची नोंद वरील FIR नुसार प्राप्त झालेली आहे. म्हणुन वरील पावती क्र. 4091565 ते 4091600 पर्यंतच्या न वापरलेल्या 36 पावत्या या कार्यालयातील तत्कालीन कार्यरत अधिकारी, कार्यालयीन अधिक्षक, उद्योग निरीक्षक व अन्य इतर कर्मचारी व अन्य इतर यांचे स्वाक्षरीने निर्गमित झाले असतील किंवा भविष्य काळात निर्गमित होतील. अशा वसुल रकमेस किंवा शासनाच्या अन्य विभागात वसुलीसाठी अधिकृत पावती/पावत्या म्हणुन ग्राह्य धरण्यात येणार नाहीत. व सदरील सर्व पावत्या ह्या गहाळ झाल्याच्या दिनाकांपासून रद्द करण्यात येत आहे. सदरील घोषणा केल्याच्या दिनांका पासुन सदर पावत्या कोणत्याही व्यक्ती/अधिकारी/कर्मचारी यांचेकडे आढळून आल्यास किंवा त्याचा दुरपयोग केल्यास सदरचे कार्यालय जबाबदार राहणारा नाही. असे महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.