मुंबई/पुणे: पुण्यातील काही भागांत बुधवारी रात्री पावसानं थैमान घातले. अनेक रस्ते पुराच्या पाण्याखाली गेले. वस्त्यांमध्येही पाणी घुसले होते. पुरानं आतापर्यंत ११ जणांचा बळी घेतला आहे. पुण्यातील या परिस्थितीकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. तिकीटवाटपाला उशीर झाला तरी चालेल. आधी पुण्यातील पूरपरिस्थितीकडे लक्ष द्या, असा टोला राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांना लगावला.
पुण्यात बुधवारी रात्री मुसळधार पाऊस कोसळला. पुण्यातील रस्ते पाण्याखाली गेले. वाहनेही वाहून गेली. आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला असून, चार जण अद्याप बेपत्ता आहेत. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. पुण्यातील पूरपरिस्थितीकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. तिकीटवाटपाला दोन दिवस उशीर झाला तरी चालेल, पण आधी पुण्यातील पूरपरिस्थितीकडे लक्ष द्या. मदतकार्याला उशीर झालेला चालणार नाही, असं भुजबळ म्हणाले.