Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जागतिक दर्जाचे बुद्धिस्ट थीम पार्क, बिझनेस सेंटर आणि न्यू स्टेडियम प्रस्तावित 

najarkaid live by najarkaid live
June 27, 2020
in राज्य
0
ADVERTISEMENT
Spread the love

नागपूर, दि.२७ : देशाच्या मध्यभागी आणि विकासाच्या दृष्टीकोनातून अत्यंत सोयीचे असलेल्या नागपूरचा कायापालट करून कोराडी येथे ऊर्जा शैक्षणिक पार्क, भव्य हनुमान मूर्ती स्मारक, सेल्फी पॉइंट, तलाव सौंदर्यीकरण करण्याचे प्रस्तावित आहे. सोबतच, फुटाळा तलाव येथे बुद्धिस्ट थीम पार्क, यशवंत स्टेडियम परिसरात जागतिक दर्जाचे अत्याधुनिक नवीन  स्टेडीयम, वाहन विरहीत बिझनेस सेंटर उभारून देश-विदेशातील पर्यटक आणि  नागरिकांच्या  आकर्षणाचे केंद्र बिंदू बनविण्याचा मानस असल्याचे नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सांगितले. महावितरणच्या “ऊर्जा अतिथीगृह” नागपूर येथे व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित बैठकीत ते बोलत होते.

राज्याच्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी कोराडी येथे ‘ऊर्जा पार्क’ प्रकल्पाची घोषणा केली होती. त्यानुसार, जमीन, पाणी आणि मुलभूत सोयी सुविधा उपलब्ध असल्याने नागपूर जवळच्या कोराडी येथे उर्जेचे विविध स्त्रोत आणि त्याचा मानवी जीवनाला होणारा उपयोग लक्षात घेऊन शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना यातून हसत-खेळत शिक्षण मिळावे, त्यांना उर्जेचे स्त्रोत प्रत्यक्ष प्रकल्प स्थळी हाताळता यावे, सोबतच मनोरंजन व्हावे आणि पर्यटनाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी निर्माण करणे या उद्देशाने हा ऊर्जा पार्क उभारण्यात येणार आहे.

ऊर्जा पार्कद्वारे, हरित ऊर्जा, उर्जेच्या  विविध स्त्रोतांना आधुनिकतेची जोड देण्यात येणार आहे. ऊर्जा वनस्पतींचे उद्यान, सौर विद्युत व्यवस्था, उर्जेच्या विविध स्त्रोतांचे जसे औष्णिक, जल, वायू, पवन, सौर, बायोमास लाइव्ह मॉडेल्स, सौर चार्जिंग स्टेशन्स, परिसर सौंदर्यीकरण करून हा अभिनव प्रकल्प  प्रस्तावित आहे. एकूणच, पर्यटकांच्या दृष्टीने भव्य हनुमान मूर्ती उभारून यामाध्यमातून पर्यटनाचे हब बनविण्याचे प्रस्तावित आहे.

फुटाळा तलाव येथे जागतिक दर्जाचे बुद्धिस्ट थीम पार्क आणि यशवंत स्टेडियम येथे नवीन स्टेडियम आणि बिझनेस सेंटर उभारण्याचे प्रस्तावित आहे. या  सर्व प्रकल्पांचा आराखडा  प्राथमिक अवस्थेत असून निधीची तरतूद करून सदर प्रकल्प साकारण्याचा मानस डॉ.राऊत यांनी व्यक्त केला.

ह्या प्रस्तावित प्रकल्पांचे संगणकीय सादरीकरण नागपूरातील प्रसिद्ध वास्तूरचनाकार अशोक मोखा यांनी केले. सादरीकरणानंतर माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक, विभागीय आयुक्त संजीव कुमार, जिल्हाधिकारी रविंद्र  ठाकरे, मनपा आयुक्त तुकाराम मुंढे, रमण विज्ञान केंद्राचे संचालक विजय शंकर शर्मा यांची मते जाणून घेण्यात आली तर व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे प्रधान सचिव(ऊर्जा) दिनेश वाघमारे, अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक महानिर्मिती शैला ए., महाऊर्जा संचालक सुभाष डूमरे, नेहरू विज्ञान केंद्राचे सुर्यकांत कुळकर्णी, अशोक जोगदे एफर्ट प्लेनेटोरीयम, रवी बनकर यांनी आपली मते मांडली आणि प्रकल्प विषयक विधायक सूचना देखील दिल्या. बैठकीचे अध्यक्षस्थान डॉ. नितीन राऊत यांनी भूषविले.

नागपूरपासून केवळ ४० किलोमीटर अंतरावर  घनदाट जंगल आहे. संत्रानगरी सोबतच हा जिल्हा टायगर कॅपिटल म्हणून देखील ओळखला जातो. नागपूर जिल्ह्यात खनिज, वनसंपदा भरपूर असून कोळसा खाणी, गोरेवाडा प्राणी संग्रहालय, औष्णिक विद्युत केंद्रे, आंतरराष्ट्रीय विमानतळ, मेट्रो, राष्ट्रीय महामार्ग, मध्य आणि दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने हा भाग जोडला गेला आहे. दीक्षाभूमी, संघ मुख्यालय, ताजबाग, रामटेक सारखे तीर्थक्षेत्र असल्याने विदर्भाच्या विकासाचे स्वप्न उद्योग उभारून आणि पर्यटनाच्या माध्यमातून पूर्ण करता येतील. पर्यटन हे सर्वांगीण विकासाचे ग्रोथ इंजिन असून यामुळे हॉटेल तसेच सेवा उद्योग विकसित होतील. यामुळे एकूण घरगुती उत्पादन आणि दरडोई उत्पन्न वाढीस लागेल, असा विश्वास डॉ.राऊत यांनी व्यक्त केला.

बैठकीला नागपूर विभागातील सर्व प्रशासनिक अधिकारी तसेच महानिर्मितीचे  मुख्य अभियंता अनंत देवतारे, नासुप्र मुख्य अभियंता सुनील गुज्जलवार, मेट्रो अधिकारी राजीव एल्कावार, आणि हाय पॉवर कमिटीचे अनिल नगरारे, रमाकांत मेश्राम आणि अनिल खापर्डे प्रामुख्याने उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कोरोनाच्या काळात पोलिसांनी शासनाची प्रतिमा उंचावली – गृहमंत्री अनिल देशमुख यांचे गौरवोद्गार

Next Post

संतांच्या पादुका पंढरपूरला घेऊन जाण्यासाठी इन्सीडेंट कमांडरच्या नेमणूका

Related Posts

Sex Racket Exposed in Mumbai | हॉटेलमध्ये परदेशी महिलांसह सेक्स रॅकेट उघड

Sex Racket Exposed in Mumbai | हॉटेलमध्ये परदेशी महिलांसह सेक्स रॅकेट उघड

July 27, 2025
Pune Rave Party : पुण्यात फ्लॅटवर रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा ; खडसेंचे जावई पोलिसांच्या ताब्यात

Pune Rave Party : पुण्यात फ्लॅटवर रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा ; खडसेंचे जावई पोलिसांच्या ताब्यात

July 27, 2025
Mumbai Pune Expressway Accident

Mumbai Pune Expressway Accident : कंटेनरची २० वाहनांना धडक ; ४ ठार, आरडाओरड, गोंधळ आणि रक्ताने माखलेली दृश्ये

July 26, 2025
Best Credit Card 2025: तुम्ही कुठले क्रेडिट कार्ड घ्यावे? जाणून घ्या..

Best Credit Card 2025: तुम्ही कुठले क्रेडिट कार्ड घ्यावे? जाणून घ्या..

July 26, 2025
RTI माहिती अधिकाराचा अर्ज कसा करावा?

RTI Guide in marathi: माहितीचा अधिकार अर्ज कसा करावा – संपूर्ण मार्गदर्शक RTI 2025

July 26, 2025
Jio 601 Plan | जिओचा नवा धमाका – वर्षभर फ्री 5G डेटा!

Jio 601 Plan | जिओचा नवा धमाका – वर्षभर फ्री 5G डेटा!

July 24, 2025
Next Post
संतांच्या पादुका पंढरपूरला घेऊन जाण्यासाठी इन्सीडेंट कमांडरच्या नेमणूका

संतांच्या पादुका पंढरपूरला घेऊन जाण्यासाठी इन्सीडेंट कमांडरच्या नेमणूका

ताज्या बातम्या

Sex Racket Exposed in Mumbai | हॉटेलमध्ये परदेशी महिलांसह सेक्स रॅकेट उघड

Sex Racket Exposed in Mumbai | हॉटेलमध्ये परदेशी महिलांसह सेक्स रॅकेट उघड

July 27, 2025
Best banks for loans : कर्ज घेण्यासाठी सर्वोत्तम बँका कोणत्या?

Best banks for loans : कर्ज घेण्यासाठी सर्वोत्तम बँका कोणत्या?

July 27, 2025
Loan without CIBIL Score: क्रेडिट स्कोअर नसतानाही मिळणार कर्ज? हे ५ पर्याय वापरा!

Loan without CIBIL Score: क्रेडिट स्कोअर नसतानाही मिळणार कर्ज? हे ५ पर्याय वापरा!

July 27, 2025
Gold Loan फायदे, तोटे,व्याजदर आणि सावधगिरी - सोने तारण कर्ज संपूर्ण माहिती

Gold Loan फायदे, तोटे,व्याजदर आणि सावधगिरी – सोने तारण कर्ज संपूर्ण माहिती

July 27, 2025
Pune Rave Party : पुण्यात फ्लॅटवर रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा ; खडसेंचे जावई पोलिसांच्या ताब्यात

Pune Rave Party : पुण्यात फ्लॅटवर रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा ; खडसेंचे जावई पोलिसांच्या ताब्यात

July 27, 2025
Jilha Parishad Yojana 2025 |पिठाची गिरणी, शिलाई मशीन, तार कुंपणसह मिळवा 100% अनुदान!

Jilha Parishad Yojana 2025 |पिठाची गिरणी, शिलाई मशीन, तार कुंपणसह मिळवा 100% अनुदान!

July 27, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us