- जळगाव शहरात “रेशन” चा काळाबाजार !
- रेशन दुकान मालका कडून महिन्याला “हजार रुपयाचा हप्ता” मिळावा म्हणून अधिकाऱ्याचा तगादा : दुकानदार त्रस्त
जळगाव – रेशन वितरण प्रणालीमधील अनागोंदी रोखण्यासाठी एक ना एक अनेक उपाय योजना सध्या पुरवठा विभागाकडून सुरु आहे तरी सुद्धा जळगावातील काही रेशन दुकानदारांनी पुरवठा तपासणी अधिकारी यांना हाताशी धरून “रेशन” चा काळा बाजार सुरूच ठेवलाय.यामुळे स्वस्त धान्य दुकानातील धान्य थेट काळ्या बाजारात विक्री होत आहे.
शहरात मागील काही काळात शिधावाटप दुकानात धान्याचा काळाबाजार होत असल्याच्या घटना वारंवार समोर आल्या आहेत शासन दरबारी अनेक तक्रारी सुद्धा दाखल आहेत मात्र वरिष्ठ अधिकारी कारवाई कारवाई करायला धजत नाही असेच पाहायला मिळाले आहे. एकीकडे पुरवठा विभाग ऑनलाईन करून भ्रष्टाचार मुक्ती कडे वाटचाल करीत असताना जळगाव तहसील कार्यालयातील तपासणी अधिकारी “वरकमाई” च्या नावाने रेशन दुकानदारांना प्रति एका दुकानाचे हजार रुपये प्रति महिना मागणी करत असल्याचे स्वस्त धान्य दुकानदारांनी सांगितले.जे प्रामाणिक पणे रेशन दुकान चालविता त्यांना अधिकाऱ्याला महिन्याला पाचशे रुपये देणे सुद्धा जड जाते परंतु काही रेशन दुकानदार यांनी “अनोखी शक्कल लढवून ऑनलाईन च्या काळातही रेशन चा काळा बाजार थाटलाय” अशा दुकानदारांना तर ही अधिकाऱ्यांची पर्वणीच म्हणावी लागेल.एका एका दुकानाला पाच ते सात दुकाने जोडली आहेत.त्या दुकान मालकांकडून त्या अधिकाऱ्याला पाच ते सात हजार रुपये मिळत असल्याचे समजते.जळगावच्या पुरवठा विभागात अधिकारी व स्वस्त धान्य दुकानदारांचे साटेलोटे आहे हे मात्र निश्चित.पुरवठा विभागात ई – पॉस मशिनी येऊन सर्व ऑनलाईन झाले तरीही रेशनचा काळा बाजार कसा बोकाळला हे वृत्त पुढील भाग 2 च्या बातमीत वाचायला मिळेलच.