- जळगाव शहर मतदार संघात प्रचार रॅलीचे ठिकठिकाणी स्वागत

जळगाव (प्रतिनिधी)- काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पी.आर.पी. कवाडे गट-स्वाभिमानी शेतकरी संघटना या आघाडीतर्फे लढणारे आघाडीचे उमेदवार अभिषेक शांताराम पाटील यांचा जळगाव शहर मतदार संघात आज दि. 17 रोजी प्रचार दौरा काढण्यात आला होता या प्रचाराच्या झंझावातात मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी अभिषेक पाटील यांनी मतदारांशी संवाद साधतं आशीर्वाद मागितला.शहरात एकही समस्या शिल्लक ठेवणार नसून शहरातील एमआयडीसीतील औद्योगिक विकासावर भर देऊन तरुणांच्या हाताला काम देणार असल्याचे अभिषेक पाटील यांनी मतदारांशी बोलतांना संगितले.
आज दि.17 रोजी जळगाव शहर मतदार संघातील हरीविठ्ठल नगर, राजीव नगर, आशाबाबा नगर, श्रीधर नगर, अर्जुन नगर, राजीव गांधी नगर, बकरे मळा, चंद्रप्रभा कॉलनी, आनंद नगर, गणेश कॉलनी, विधी महाविद्यालय परिसर, बुक बँड कॉलनी, यशवंत नगर, प्रोफेसर नगर, आर. एम. एस. कॉलनी, शामराव नगर परिसरात प्रचार करत प्रचंड प्रचार रॅली काढण्यात आली.यावेळी मतदारांनी देखील उस्फुर्त प्रतिसाद दिला.

यावेळी माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक, महानगर जिल्हाध्यक्ष नामदेवराव चौधरी, विधानसभा क्षेत्र प्रमुख लीलाधर तायडे, महिला जिल्हाध्यक्ष कल्पना पाटील, मीनल पाटील, किरण राजपूत, राजू मोरे, मंगला पाटील, सचिन पाटील, विकास पवार, राजेश पाटील, आशा येवले, दुर्गेश पाटील, सचिन पाटील, रितेश पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.














