- शिवाजीनगर परिसरात कॉर्नर बैठक तर मतदार संघात माजी मंत्री यांच्या प्रचाराचा झंजावात

जळगाव – विकासासाठी मी वचनबद्ध असून आपण सेवेची संधी दिल्यास समस्या मुक्त शहर निर्माण करण्याची जबाबदारी स्वीकारेल असे जळगाव शहर मतदार संघात प्रचारादरम्यान आज शिवाजी नगर परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार अभिषेक पाटील यांनी कॉर्नर सभा घेऊन मतदारांशी संवाद साधतेवेळी सांगितले यावेळी हाजी साहेब, मझर पठाण, भरत कर्डीले आदी पदाधिकारी उपस्थित होते.तर मतदार संघात माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या ताफ्यासह जोरदार प्रचार केला.

मतदार संघात बेरोजगारांच्या हाताला काम उपलब्ध करू देण्यासह शहराला “बेरोजगार मुक्त” करणार असल्याचे राष्ट्रवादी, काँग्रेस आघाडीचे उमेदवार अभिषेक शांताराम पाटील यांनी आज प्रचारादरम्यान मतदारांशी संवाद साधते वेळी केला.
जळगाव शहरात राष्ट्रवादी, काँग्रेस आघाडी पक्षाने जोरदार प्रचार करत कॉर्नर मीटिंगवर भर दिली जात आहे. तर आघाडीचे उमेदवार अभिषेक पाटील यांनी शहर मतदार संघात प्रचार रॅली, कॉर्नर बैठका, वैक्तिक भेटीगाठीवर भर देत एकदा सेवेची संधी द्या… शहरातील एकही समस्या शिल्लक ठेवणार नही असे वचन देत आहे. शहरात औद्योगिक विकास साधला जाईल, बेरोजगारांच्या हाताला काम देण्यास मी वचनबद्ध असल्याचे अभिषेक पाटील यांनी मतदारांशी बोलतांना या कॉर्नर बैठकीत सांगितले आहे.















