जळगाव – येथील महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळात सन 2012 ते जानेवारी 2019 कालावधी मधील बीज भांडवल योजने अंतर्गत बोगस कर्ज प्रकरणे मंजूर करून आर्थिक गैरव्यवहार केल्या प्रकरणी जळगाव कार्यालयातील कर्ज प्रकरणाच्या 702 फाईल वरिष्ठ कार्यालय, मुंबई यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्या असून या प्रकरणी प्राथमिक स्वरूपात दोषी धरण्यात आलेल्या चार कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.