जळगाव ;- जळगाव ते पाचोरा जाणारी बस एम.एच.20.डी. 8642 रामदेवाडीजवळ रस्त्याच्या साईडपट्ट्या खोल असल्यामुळे डाव्या बाजूला झुकली . तसेच बसचा दरवाजा उघडत नसल्याने प्रवाशांची एकाच भंबेरी उडाली होती . त्यामुळे प्रवाशांना खिडकी आणि चालकाच्या दरवाजातून बाहेर काढण्यात आल्याने अनेकांचा जीव भांड्यात पडला .
या वेळी राहुल पाटील , गोपाल धनगर आदींनी प्रवाशांची मदत करून सुखरूप बाहेर काढले . या वेळी कुणाला ही दुखापत झाली नाही. दरम्यान यामुळे रस्त्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून बांधकाम विभागाने त्वरित भराव टाकून साईड पट्ट्या बुजवाव्यात अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.