Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव जिल्ह्यात 94 टक्के कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले

najarkaid by najarkaid
October 20, 2020
in आरोग्य, जळगाव
0
जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात 21 हजार रुग्णांची कोरोनावर मात
ADVERTISEMENT

Spread the love

•  जिल्ह्यातील 48 हजार 935 रुग्णांची कोरोनावर मात.

•      आतापर्यंत 2 लाख 40 हजार 903 कोरोना संशयितांचे स्वॅब घेण्यात आले.

•      सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी अवघे 459 रुग्ण लक्षणे असलेले, पैकी 189

        रुग्णांना ऑक्सिजन वायु सुरु तर 74 रुग्ण आयसीयुमध्ये दाखल

•      जिल्ह्यात एकूण मृत्यु झालेल्या व्यक्तींपैकी 1092 रुग्ण 50 वर्षापेक्षा अधिक

       वयोगटातील.

•      जिल्ह्यात अवघ्या 126 कोरोना संशयितांचे तपासणी अहवाल प्रलंबित

जळगाव,  दि. 20 – जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांमुळे जिल्ह्यात आतापर्यंत आढळून आलेल्या बाधित रुग्णांपैकी 94 टक्के रुग्ण बरे होऊन सुखरुप घरी गेल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेली माझे कुटूंब, माझी जबाबदारी मोहिम जिल्ह्यात राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणांसोबतच आरोग्य विभागाचे कर्मचारी, आशा कार्यकर्त्या व आंगणवाडी सेविकाही घरोघरी जाऊन नागरीकांची तपासणी करीत आहे.

जिल्ह्यात आज (19 ऑक्टोबर) रोजी 169 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत 48 हजार 935 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.03 टक्क्यांवर पोहोचले आहे. जिल्ह्यात सध्या 1 हजार 862 ॲक्टीव्ह रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत असून पैकी 1 हजार 255 रुग्ण हे गृह अलगीकरणात आहेत. सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी 1 हजार 403 रुग्ण हे लक्षणे नसलेले तर अवघे 459 रुग्ण हे लक्षणे असलेले असून यापैकी 189 रुग्णांना ऑक्सिजन वायु सुरु आहेत तर 74 रुग्ण आयसीयुमध्ये दाखल आहेत. कोविड केअर सेंटरमध्ये 147 रुग्ण, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये 256, डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये 203 रुग्ण उपचार घेत आहेत. तर विलगीकरण कक्षात 202 रुग्ण आहेत. जिल्ह्यात माझे कुटूंब, माझी जबाबदारी मोहिम अतिशय प्रभावीपणे राबविण्यात येऊन मोठ्या प्रमाणात कोमॉर्बिड रुग्ण शोधण्यात आले. तसेच त्यांची त्वरीत तपासणी करुन त्यांचेवर उपचार करण्यात आल्याने गेल्या महिन्याभरापासून जिल्हृयात सलगपणे बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली असून उपचार घेणाऱ्या ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या कमी झाली ही जिल्ह्यासाठी समाधानाची बाब आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालकमंत्र्यांच्या आवाहनाला लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, संघटना, सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, दानशूर व्यक्ती यांनी उत्सफुर्तेपणे प्रतिसाद दिल्याने जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात ऑक्सिजनयुक्त बेड तयार झाले आहेत. सद्य:परिस्थितीमध्ये जिल्ह्यात 12 हजार 854 बेड असून त्यापैकी 2 हजार 19 ऑक्सिजनयुक्त बेड असून 322 आयसीयु बेडचा समावेश आहे.

माझे कुटूंब, माझी जबाबदारी मोहिमेतंर्गत आढळून आलेल्या कोरोना संशयितांना लक्षणे जाणवताच त्यांची तपासणी करण्यात येत आहे. तसेच आवश्यकता भासल्यास त्यांचे स्वॅबही तपासणीसाठी घेण्यात येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत आरटी-पीसीआरद्वारे 1 लाख 4 हजार 840 तर रॅपिड ॲन्टीजेन टेस्टद्वारे 1 लाख 36 हजार 63 अशा एकूण 2 लाख 40 हजार 903 कोरोना संशयितांच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत. यापैकी 1 लाख 87 हजार 613 चाचण्या निगेटिव्ह तर 52 हजार 41 चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असून इतर अहवालांची संख्या 1 हजार 123 असून अवघे 126 तपासणी अहवाल प्रलंबित आहेत. जिल्ह्यात एका दिवसात 3 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असून आतापर्यंत 1 हजार 244 रुग्णांचा मृत्यु झाला आहे. जिल्ह्यात एकूण मृत्यु झालेल्या व्यक्तींपैकी 1 हजार 92 रुग्ण हे 50 वर्षा पेक्षा अधिक वयोगटातील असून 561 रुग्ण हे आजारपण (कोमॉर्बिड) असलेले आहेत. बाधित रुग्णांना आवश्यक ते उपचार व सोयीसुविधा वेळेवर मिळाल्याने  जिल्ह्यातील बाधित रुग्णांचा मृत्युदर हा 2.39 टक्क्यांपर्यंत खाली आला असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक तथा नोडल अधिकारी कोविड-19 डॉ. एन. एस. चव्हाण यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या कमी होत असली तरी नागरीकांनी बेसावध न राहता शासनाच्या नियमांचे पालन करावे. मास्क हीच कोरोनाची लस आहे असे गृहीत धरुन घराबाहेर पडताना नेहमी मास्कचा वापर करावा, गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे, सामाजिक अंतर राखावे, हात साबणाने स्वच्छ धुवावे, सॅनेटायझरचा वापर करावा. कोरोना सदृश्य लक्षणे जाणवताच तपासणी करुन घ्यावी. असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

ऑनलाईन पेटीएम अपहार करणाऱ्या पेटीएम कर्मचाऱ्यास सायबर विभागाने केले जेरबंद

Next Post

भाजपा जिल्हाध्यक्ष आ. राजूमामा भोळे पोहचले नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

March 22, 2026
Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

March 22, 2026
बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
Next Post
भाजपा जिल्हाध्यक्षआ.राजुमामा भोळे पोहचले नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर

भाजपा जिल्हाध्यक्ष आ. राजूमामा भोळे पोहचले नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर

ताज्या बातम्या

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

March 22, 2026
नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

March 22, 2026
Ordnance Factory Bhandara Bharti

Ordnance Factory Bhandara Bharti 2026: भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरीत 400 पदांसाठी मोठी भरती

March 22, 2026
Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

March 22, 2026
Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

March 22, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us