Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव जिल्ह्यात 24 पासून कोविड 19 रुग्ण शोध मोहीम

नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन ; जिल्हाधिकारी अभिजित राऊत

najarkaid by najarkaid
March 23, 2021
in जळगाव
0
जळगाव महानगर क्षेत्रात तीन दिवस जनता कर्फ्यु
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, दि. 23 (प्रतिनिधी): कोरोना विषाणूचा (COVID19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रासह महानगरपालिका नगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या क्षेत्रात बुधवार 24 मार्च 2021 पासून ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ मोहिमेच्या धर्तीवर ‘कोविड 19’ रुग्ण शोध मोहीम आरोग्य विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे. जळगाव जिल्ह्यातील नागरिकांनी या शोध मोहिमेस सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी म्हटले आहे, जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना विषाणूबाधित रुग्णांची संख्या मोठ्या संख्येने वाढत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाच्या माध्यमातून जिल्हा प्रशासन सर्वंकष प्रयत्न करीत आहे. तसेच तालुकास्तरावर कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर, ऑक्सिजनयुक्त बेड कार्यान्वित करण्यात आले आहेत.

कोरोना विषाणूबाधित रुग्णांचा शोध लवकरच होवून त्यांना वेळेत औषधोपचार उपलब्ध व्हावेत म्हणून ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ या महत्वाकांक्षी मोहिमेच्या धर्तीवर बुधवारपासून ‘कोविड 19’ शोध मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत नागरिकांची माहिती, वय, तापमान, ऑक्सिजनची पातळी, सहव्याधी रुग्ण असल्यास त्याची माहिती, लसीकरण झाले किंवा नाही, कोविड 19 संशयित असलेल्या रुग्णाचे ठिकाण आदी माहिती संकलित केली जाणार आहे.

या मोहिमेमुळे कोरोनाबाधित रुग्णांचा शोध लागून त्यांच्यावर तातडीने औषधोपचार करणे शक्य होणार आहे. त्यामुळे कोरोना विषाणूबाधित रुग्णांवर वेळेत औषधोपचार होवून मृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी घरी येणाऱ्या आरोग्य विभागाच्या पथकांना खरी माहिती देवून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी केले आहे.

या शोध मोहिमेस लोकप्रतिनिधी, सरपंच, पोलिसपाटील, तलाठी, ग्रामसेवकांसह स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी सहकार्य करणार आहेत, असेही जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी म्हटले आहे.

00000

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्ह्यात 1093 कोरोना बाधित रुग्ण आढळले तर 12 बाधितांचा मृत्यू

Next Post

गृहमंत्री नागपुरात ‘होम कॉरंटाईन’ होते असं आम्ही कधीच म्हटलं नाही – नवाब मलिक

Related Posts

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
Next Post
आघाडी सरकारचे आमदार फोडता येत नसल्याने भाजप कडून केंद्राचा वापर करुन सरकार बदलण्याचे प्रयत्न

गृहमंत्री नागपुरात 'होम कॉरंटाईन' होते असं आम्ही कधीच म्हटलं नाही - नवाब मलिक

ताज्या बातम्या

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

March 26, 2026
तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 8th Installment: 1798.78 कोटींचे वितरण; 89 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

March 25, 2026

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us