Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव जिल्ह्यात २७ नवीन रूग्णवाहिका दाखल होणार – पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

najarkaid live by najarkaid live
December 19, 2023
in जळगाव
0
जळगाव जिल्ह्यात २७ नवीन रूग्णवाहिका दाखल होणार – पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील
ADVERTISEMENT
Spread the love

जळगाव, दि.१९ (प्रतिनिधी ) – पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी नवीन १९ रूग्णवाहिका खरेदीस काल मंजुरी दिली. मागील महिन्यात ग्रामीण रूग्णालयांसाठी मंजूर केलेल्या ८ रूग्णवाहिका व आज प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी मंजूर केलेल्या १९ रूग्णवाहिका अश्या एकूण २७ रूग्णवाहिका जिल्ह्यात फेब्रुवारी पर्यंत दाखल होतील. यामुळे जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम होणार आहे.

जिल्हा वार्षिक योजना २०२३ – २४ (सर्वसाधारण) निधीच्या माध्यमातून रूग्णवाहिका खरेदी करण्यास पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी परवानगी दिली आहे.   जिल्ह्यातील  प्राथमिक आरोग्य केंद्र जानवे (ता.अमळनेर), तामसवाडी (पारोळा), लोंढे, तरवाडे, खेडगाव (चाळीसगाव)

वरखेडी, लोहटार (पाचोरा),

कठोरा, वराडसिंम, पिंपळगाव (भुसावळ), अंतुर्ली (मुक्ताईनगर), भालोद, सावखेडा (यावल), नशिराबाद (जळगाव), भालोद (रावेर), गारखेडा, वाकडी (जामनेर),  चांदसर,  पाळधी (धरणगाव) साठी १९ नवीन रूग्णवाहिकांना पालकमंत्र्यांनी तातडीने मंजुरी दिली आहे. लवकरच याबाबत तांत्रिक मंजुरी साठी नाशिक उपसंचालकांकडे प्रस्ताव पाठविण्यात येऊन दोन दिवसांत मान्यता घेतली जाईल. प्रशासकीय मंजुरी मिळाल्यानंतर टेंडर प्रक्रिया राबविण्यात येऊन फेब्रुवारी २०२४ पर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी नवीन १९ अद्यावत रूग्णवाहिका खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर यांनी दिली आहे.

जिल्हा रूग्णालय व अधिनस्त ग्रामीण रूग्णालयांना ८ नवीन रूग्णवाहिका खरेदीस पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नोव्हेंबर २०२३ महिन्यात मंजुरी दिली होती. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या पाठपुराव्यामुळे रूग्णवाहिका खरेदीच्या प्रस्तावास आरोग्य सेवा आयुक्तांनी एका दिवसातच तांत्रिक मान्यता दिली होती. या रूग्णवाहिकांची सध्या टेंडर  प्रक्रिया राबविण्यात येत आहे. जानेवारी २०२४ पर्यंत या नवीन ८ रूग्णवाहिका ग्रामीण रूग्णालयात रूग्णसेवेत दाखल होणार आहेत. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील यांनी दिली आहे.

जिल्हा वार्षिक योजना २०२३-२४ अंतर्गत जळगाव जिल्हा सामान्य रूग्णालय व त्यांच्या अधिनस्त ७ ग्रामीण रूग्णालयांमध्ये न्हावी (यावल) अमळगांव (अमळनेर),  मेहुणबारे (चाळीसगांव), पिंपळगांव हरेश्वर (पाचोरा), बोदवड, एरंडोल, भडगांव या ८ रुग्णालयांसाठी प्रत्येकी १ (रुपये १८,०६,३००/- प्रति रुग्णवाहिकाप्रमाणे) अशा एकूण ८ पेशंट ट्रान्सपोर्ट टाईप बी एसी रुग्णवाहिका खरेदी करण्यात येणार आहेत.

“जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून वेळोवळी मदत करण्यात येत असते. नवीन रूग्णवाहिकांचा जिल्ह्यातील सर्वसामान्य रूग्णांना फायदा होणार आहे. भविष्यात ही जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था सक्षमीकरणासाठी सर्वतोपरी मदत करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. ” अशी प्रतिक्रिया पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची कार्यक्रम पत्रिका जाहीर; जय्यत तयारी सुरू 

Next Post

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी ; ‘शाळा’ भरणार सकाळी ९ नंतर, शिक्षण मंत्र्यांची घोषणा!

Related Posts

जळगाव जिल्ह्यातील सुरुवात : मुलींच्या स्वप्नांना नवे पंख देणारी -बालिका स्नेही पंचायत

जळगाव जिल्ह्यातील सुरुवात : मुलींच्या स्वप्नांना नवे पंख देणारी -बालिका स्नेही पंचायत

August 20, 2025
प्रवीणसिंह पाटील(राजपूत) यांची करणी सेना महाराष्ट्र कार्यकारी प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती

प्रवीणसिंह पाटील(राजपूत) यांची करणी सेना महाराष्ट्र कार्यकारी प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती

August 18, 2025
पत्रकार अनिलआबा येवले यांची पाचोरा पीपल्स बँकेत निमंत्रित सदस्यपदी नियुक्ती

पत्रकार अनिलआबा येवले यांची पाचोरा पीपल्स बँकेत निमंत्रित सदस्यपदी नियुक्ती

August 17, 2025
धरणगाव पंचायत समिती आढावा बैठक संपन्न –   समन्वयाने काम करा, योजनांची गती वाढवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

धरणगाव पंचायत समिती आढावा बैठक संपन्न –  समन्वयाने काम करा, योजनांची गती वाढवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 17, 2025
Jalgaon news : जिल्हा नियोजन मधून झालेल्या कामाचे विशेष कौतुक ;   येत्या बजेट मध्ये जिल्ह्याला निधी देणार वाढवून  – उपमुख्यमंत्री अजित पवार   

Jalgaon news : जिल्हा नियोजन मधून झालेल्या कामाचे विशेष कौतुक ;  येत्या बजेट मध्ये जिल्ह्याला निधी देणार वाढवून – उपमुख्यमंत्री अजित पवार  

August 17, 2025
जळगावच्या मेडिकल हबची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पाहणी

जळगावच्या मेडिकल हबची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पाहणी

August 17, 2025
Next Post
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी ; ‘शाळा’ भरणार सकाळी ९ नंतर, शिक्षण मंत्र्यांची घोषणा!

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी ; 'शाळा' भरणार सकाळी ९ नंतर, शिक्षण मंत्र्यांची घोषणा!

ताज्या बातम्या

ब्रेकिंग : आझाद मैदानात आंदोलकाचा गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न

ब्रेकिंग : आझाद मैदानात आंदोलकाचा गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न

August 29, 2025
जळगाव जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आज झाले ‘हे’ महत्त्वाचे निर्णय !

जळगाव जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आज झाले ‘हे’ महत्त्वाचे निर्णय !

August 29, 2025
मुंबईत पावसातही मराठा समाज ठाम, Manoj Jarange Patil उपोषणाला मोठा प्रतिसाद, राजकीय हालचालींना वेग, अलोट गर्दी सुरक्षा वाढवली

मुंबईत पावसातही मराठा समाज ठाम, Manoj Jarange Patil उपोषणाला मोठा प्रतिसाद, राजकीय हालचालींना वेग, अलोट गर्दी सुरक्षा वाढवली

August 29, 2025
आ. मंगेश चव्हाण यांचा मोठा गौप्यस्फोट! LCB पीआय वादात, गोळीबाराची धमकी, कॉल रेकॉर्डिंग, महिलेचे लैंगिक शोषण, नेमकं काय प्रकरण काय?

आ. मंगेश चव्हाण यांचा मोठा गौप्यस्फोट! LCB पीआय वादात, गोळीबाराची धमकी, कॉल रेकॉर्डिंग, महिलेचे लैंगिक शोषण, नेमकं काय प्रकरण काय?

August 29, 2025
देशभरात मुसळधार पावसाचा इशारा

देशभरात मुसळधार पावसाचा इशारा!

August 29, 2025
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी विविध देशांच्या महावाणिज्य दूतांनी  घेतले गणेश दर्शन, मनोभावे आरतीही केली

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी विविध देशांच्या महावाणिज्य दूतांनी घेतले गणेश दर्शन, मनोभावे आरतीही केली

August 29, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us