Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव जिल्ह्यात उद्या पासून ग्राहक उपयोगी दुकाने सुरु होणार

najarkaid by najarkaid
May 4, 2020
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

  • कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी
    नागरीकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये
    – जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे

जळगाव,दि. 4 – कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने तिसऱ्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील नागरीकांनी लॉकडाऊनच्या कालावधीत अनावश्यक प्रवास टाळावा. विनाकारण घराबाहेर पडू नये, मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन कोरोनास हरविण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी केले.

लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्पयाची माहिती देण्यासाठी  नियोजन भवनात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ ढाकणे प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी वार्तालाप करताना बोलत होते. याप्रसंगी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, महानगरपालिकेचे आयुक्त सतिश कुलकर्णी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण पाटील आदि उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना माहिती देतांना पुढे सांगितले की, सर्व प्रकारच्या ग्राहकउपयोगी दुकाने सुरु ठेवण्याची अनुमती देत असतानाच त्यांना काही अटी व शर्ती घालून दिलेल्या आहेत. यामध्ये सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन करणे, ग्राहक आणि दुकानदार यांनी मास्क वापरणे, दुकानाच्या बाहेर ग्राहकांसाठी सॅनिटायझर उपलब्ध करुन देणे, दिलेल्या वेळेतच दुकाने सुरू ठेवणे अशाप्रकारे नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यास दिलेल्या सवलती पुढेही सुरू ठेवता येतील. लग्नसमारंभास 50 लोकांची उपस्थिती तर अंत्ययात्रेस 20 लोक उपस्थित राहू शकतील याप्रमाणे परवानगी असेल मात्र तेथेही सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपण पालन अपेक्षित आहे.
सर्व प्रकारची दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देत असताना सार्वजनिक वाहतूक, धार्मिक कार्यक्रम, शाळा, महाविद्यालये, मॉल्स, स्पा, सलुन दुकाने, ब्युटीपार्लर, हॉटेल्स, रेस्टॉरंट, परमीट रुम, बार 17 मे पर्यंत बंद राहतील. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनाचे एकूण 52 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून त्यातील 2 बरे होवून त्यांना घरी सोडण्यात आलेले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 13 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला असून 3 रुग्णांचा दवाखान्यात दाखल करण्यापुर्वीच मृत्यू झालेला होता. तर आणखी 3 रुग्ण अत्यावस्थस्थितीतच दाखल झाल्याने त्यांचा 1 ते 4 दिवसांच्या आत मृत्यू झालेला आहे. त्यांना या आजारासोबतच इतरही जूने आजार असल्याचे निष्पण झाले आहे. लवकरच जिल्ह्यातील कोरोना विषाणू संसर्ग तपासणी प्रयोगशाळा सुरु होणार असल्याचेही यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी सांगितले.
येथील कोविड रुग्णालयात सर्व रुग्णांची व्यवस्थित काळजी घेतली जात असून पीपीई किट, मास्क, सॅनिटायझरचा अजिबात तुटवडा नाही. त्याचबरोबर जिल्ह्यात औषधे व उपकरणांचा कमतरता नाही. जिल्ह्यात सुरक्षा तसेच दक्षतेच्या कारणास्तव एकूण 16 कटन्मेंट झोन तयार केले आहेत त्यामधील नागरिकांना बाहेर जाता किंवा बाहेरून त्यामध्ये कोणासही प्रवेश करता येणार नाही. या झोनमधील 60 वर्षावरील नागरीकांची विशेष दक्षता घेण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला देण्यात आल्या आहे. जिल्ह्यात आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी कोविड केअर सेंटर, कोविड हेल्थ सेंटर स्थापन करण्यात आले आहे. त्याचबरोबर वैद्यकीय कारण वगळता मुंबई/पुण्यातून कोणालाही जिल्ह्यात येण्यासाठी तसेच जाण्यासाठी परवानगी नाही. त्याचबरोबर जिल्ह्याच्या सिमा 17 मे पर्यंत बंदच राहणार असून मजूर, विद्यार्थी यांना जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी त्यांची पुर्णपणे वैद्यकीय तपासणी करून त्यांच्यात कोरोनाचे कुठल्याही प्रकारचे लक्षणे नाही याची खात्री पटल्यावरच त्यांना त्यांच्या जिल्ह्यात जाण्यासाठी ऑनलाईन पध्दतीने पास निर्गमित करण्यात येत आहे. जिल्ह्यातील नागरीकांनी कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी अनावश्यक प्रवास टाळावा. विनाकारण घराबाहेर पडू नये, मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी शेवटी केले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी मास्क न वापरणाऱ्यांना 500 रुपये दंड आकारला जात आहे. याबाबत कोणालाही सुट दिली गेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. स्वस्त धान्य दुकानांच्या वाटप प्रकियेत शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या आहेत, त्यांना सर्वांनी सहकार्य करून धान्य वाटप अधिक पारदर्शक होण्यासाठी मदत करावी.
जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी कोरोनापासून स्वत:चा व आपल्या परिवाराचा, परिसरातील सर्व नागरिकांचा कसा बचाव करू शकाल याची विस्तृतपणे माहिती स्पष्ट केली. जनता कर्फ्युमध्ये पोलीस आपली जबाबदारी चोखपणे बजावत आहेत. तपासणी नाक्यांवर कडक बंदोबस्त आहे. अनधिकृतपणे जिल्ह्यांच्या सिमा ओलांडण्याच्या प्रयत्न हाणून पाडण्यासाठी पोलिसांसोबत ग्राम रक्षक दल, ग्राम सुरक्षा दलाची स्थापना करण्यात आली असून ते आपले काम चोखपणे बजावत आहे तेव्हा जनतेनेही त्यांना सहकार्य करून कोरोना विषाणू घालवण्यासाठी मीच रक्षक बनावे, असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.
महानगरपालिकेचे आयुक्त सतिश कुलकर्णी यांनी प्रसारमाध्यमांना संबोधतांना सांगितले की, 28 मार्च व 1 एप्रिल या दोन दिवसात जिल्ह्यात दोनच कोरोनाचे रुग्ण होते त्यातील एकाचा मृत्यू तर एक बरा होवून त्याला घरी पाठविण्यात आल्यानंतर जिल्हा कोरोना मुक्त झाल्याने आपण सुटकेचा निश्वास सोडला होता. परंतु दुर्देवाने हा आनंद फार काळ आपल्याला टिकवता आला नाही आणि कुणाच्यातरी संपर्कात आल्याने आणि कुणाच्यातरी संसर्गामुळे जिल्ह्यतील रुग्णांची संख्या 52 वर पोहचली आहे. कारण हा आजार केवळ संपर्क आणि संसर्गामुळेच बळावतो घरात बसून हा आजार आपल्या जवळ येवूच शकत नाही. कफ्युचे प्रत्येक नागरिकाने काटेकोरपणे पालन केलेच पाहिजे. विशेष म्हणजे प्रतिबंधिक क्षेत्रात कटाक्षाने नियम पाळणे आवश्यक आहे. किरकोळ भाजी विक्रेत्यांनी दोन दुकानांमध्ये किमान 20 फुट अंतर आणि त्यांच्या दुकानासमोर एकावेळेस एकच ग्राहक असेल याची संपूर्ण जबाबदारी भाजी विक्रेत्यावर असेल. यात दिरंगाई आढळल्यास त्या विक्रेत्यास दंड आणि त्याचे दुकानही बंद करण्याच्या सुचना सर्व संबंधित यंत्रणांना दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भारतीय खाद्य निगमकडून इंडियन रेडक्रॉस सोसायटीस एक मेट्रीक टन तांदूळ सवलतीच्या दरात उपलब्ध

Next Post

लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करा राज्य ग्रीन झोनमध्ये आणण्यासाठी ठोस रिझल्ट दिसला पाहिजे –  मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला स्पष्ट निर्देश

Related Posts

कष्ट, जिद्द आणि स्वप्नांचा विजय : कोचुरचा हर्षल पाटील राज्य कर विभागात अधिकारी

कष्ट, जिद्द आणि स्वप्नांचा विजय : कोचुरचा हर्षल पाटील राज्य कर विभागात अधिकारी

April 8, 2026
जळगाव : गॅस दरवाढीविरोधात रिक्षाचालकांचा आक्रोश; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

जळगाव : गॅस दरवाढीविरोधात रिक्षाचालकांचा आक्रोश; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

April 7, 2026
Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Next Post
पालघर हत्या प्रकरणाला धार्मिक रंग देऊन भडकवू नये – मुख्यमंत्री

लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करा राज्य ग्रीन झोनमध्ये आणण्यासाठी ठोस रिझल्ट दिसला पाहिजे -  मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला स्पष्ट निर्देश

ताज्या बातम्या

Health Insurance India: HDFC ERGO कडून ‘No Limit Coverage’ हेल्थ प्लॅन लॉन्च; ₹26 प्रतिदिनात विमा!

Health Insurance India: HDFC ERGO कडून ‘No Limit Coverage’ हेल्थ प्लॅन लॉन्च; ₹26 प्रतिदिनात विमा!

April 11, 2026
IPL : 15 चेंडूत अर्धशतक! वैभव सूर्यवंशीचा स्फोटक खेळ, राजस्थानचा सलग चौथा विजय

IPL : 15 चेंडूत अर्धशतक! वैभव सूर्यवंशीचा स्फोटक खेळ, राजस्थानचा सलग चौथा विजय

April 11, 2026
School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल...

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल…

April 10, 2026
MPSC Combined Group B Bharti 2026 महाराष्ट्रात 552 पदांची भरती; अर्ज प्रक्रिया सुरू

MPSC Combined Group B Bharti 2026 महाराष्ट्रात 552 पदांची भरती; अर्ज प्रक्रिया सुरू

April 10, 2026
आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

April 10, 2026
Smartphone price hike India: भारतात मोबाईल 40% महागले!

Smartphone price hike India: भारतात मोबाईल 40% महागले!

April 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us