Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव जिल्ह्यातील ११ एप्रिलच्या महत्वाच्या बातम्या जाणून घ्या…

najarkaid live by najarkaid live
April 11, 2022
in जळगाव
0
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्यसेवा पुर्व परीक्षेची तारीख वेळ जाहीर
ADVERTISEMENT
Spread the love

महात्मा जोतीराव फुले यांना जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन

जळगाव, (प्रतिनिधी) दि. 11 :- महात्मा ज्योतीराव फुले यांना त्यांच्या जयंतीनिमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी प्रविण महाजन यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पार्पण करुन अभिवादन करण्यात आले.

 याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील,  तहसीलदार सुरेश थोरात, सहाय्यक पुरवठा अधिकारी प्रशांत कुलकर्णी, नायब तहसीलदार अमित भोईटे यांच्यासह विविध विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

00000

तहसिल कार्यालय जामनेर येथे शेतजमीनीचा जाहीर लिलाव

  जळगाव, दि. 11 (प्रतिनिधी) : – विशेष भूसंपादन अधिकारी जळगाव यांचेकडील भूसंपादन प्रस्ताव क्र. 40/02 मध्ये वसुलीची रक्कम रु. 48,32,035/- सिध्दार्थ हरी बाविस्कर, विलास हरी बाविस्कर, नाना हरी बाविस्कर, नारायण हरी बाविस्कर  आणि कुसुमताई वसंत तांबे रा. पाळधी याचेकडून वसुल करणेबाबत मा. जिल्हाधिकारी जळगाव यांनी आर.आर.सी निर्गिमित करुन आदेश पारीत करण्यात आलेले आहे. परंतु नमुद थकबाकीदार यांनी आजपावेतो सदर वसुलीची रक्कम मा. विशेष भुसंपादन अधिकारी जळगाव यांचेकडे अदा केलेली नसल्यामुळे थकबाकीदार यांचेकडील वसुलीची रक्कम वसुल करणे कामी त्यांची मौजे पाळधी ता. जामनेर येथील शेतजमीन गट क्र. 78/पै./10/ पै क्षेत्र हे 2.44 आर आकार रु. 4.03 पैसे, गट क्र. 614 क्षेत्र हे 1.40 आर आकार रु. 11.16 पैसे पैकी थकबाकीदार यांचे मालकीचे क्षेत्र हे. 0.55.42 आर आकार रु. 4.42 पैसे व गट क्र. 618 क्षेत्र हे. 1.40 आर आकार रु. 11.16 पैसे आणि मौजे पाळधी येथील घर मालमत्ता क्र. 1023 क्षेत्र 490 चौ. फुट व घर मालमत्ता क्र. 1224 क्षेत्र 435 चौ. फुट या जप्त केलेल्या शेतजमीनीचे आणि घर मालमत्तांचे दि. 19 एप्रिल, 2022 रोजी सकाळी 11 वाजता तहसिल कार्यालय जामनेर येथे जाहीर लिलाव करण्यात येत आहे. तरी जास्तीत जास्त इच्छुक व्यक्ती किंवा संस्थांनी लिलावात भाग घ्यावा, लिावातील अटी व शर्ती, लिलावातील शेतजमीन, लिलावातील बोलीहातची किंमत इत्यादी बाबत कार्यालयीन वेळेत तहसिलदार जामनेर यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन तहसिलदार अरुण शेवाळे यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

००००

 

 

सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची एलईडी व्हॅनद्वारे होणार गावोगावी प्रसिद्धी

पालकमंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखवून केले मार्गस्थ

  जळगाव, दि. 11 (प्रतिनिधी) : – अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील लोकांना त्यांच्यासाठी शासन राबवित असलेल्या योजनांची माहिती व्हावी यासाठी शासन विविध माध्यमांचा वापर करुन प्रसिद्धी करण्यात येते.. याचाच भाग म्हणून जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने एलईडी व्हॅनच्या माध्यमातून योजनांची प्रसिद्धी करण्यात येत आहे. या योजनांची माहिती घेऊन लाभार्थ्यांनी योजनांचा  लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

            जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने अनुसूचित जाती उपयोजनेमधून सामाजिक न्याय विभागाकडील योजनांची प्रसिद्धी व्हॅनद्वारे करण्यात येत आहे. या व्हॅनला पालकमंत्री  गुलाबराव पाटील यांनी हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी जिल्हाधिकारी अभिजित राऊत, समाज कल्याणचे सहायक आयुक्त योगेश पाटील, जिल्हा माहिती अधिकारी   मुकुंद चिलवंत  आदी उपस्थित होते.

 

 

            या चित्ररथावर स्वाधार योजना, रमाई आवास, सैनिकी शाळेतील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना, मिनी ट्रक्टर आदि योजनांची माहिती देण्यात आली आहे. सोबतच विविध योजनांच्या ऑडिआ  आणि व्हिडीओ जिंगल्स जाहिराती आणि माहिती पत्रिकेव्दारे देखील प्रसिध्द करण्यात येणार आहे.

 

ऑनलाईन अर्जाकरीता मोफत मार्गदर्शन वेबीनार

  जळगाव, दि. 11 (प्रतिनिधी) : – भारतीय स्वातंत्रयाच्या अमृत महोत्सवात लोकांचा सहभाग वाढावा याकरीता नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात  येत आहेत महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर  यांचे जयंतीचे औचित्य साधून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत दि. 6 एप्रिल, ते 14 एप्रिल, या कालावधीत सामाजिक समता सप्ताह साजरा करण्यात येत आहे.

 

   यानिमित्ताने जळगाव जिल्हयातील मागासवर्गीय अनुसूचित जमाती वगळून सर्व उमेदवारांच्या जात प्रमाणपत्र पडताळणी करीता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, जळगाव येथे कार्यरत आहे. 12 वी विज्ञान व्यावसायीक अभ्यासक्रमातील मागासवर्गीय विदयार्थी इत्यादींना जात वैधता प्रमाणपत्र निर्गमित करण्यात येते. अर्जदार यांची कार्यालयात गर्दी कमी करुन अर्जदारांना ऑनलाईन पध्दतीने वैधता  प्रमाणपत्र मिळावे याकरीता शासनाने ऑनलाईन सुविधा सुरु केलेली आहे. मात्र यावर अर्ज करतांना उमेदवारांना अनेकदा अडचणी येत आहे. त्यामुळे ऑनलाईन अर्जाकरीता मोफत मार्गदर्शन वेबीनार मंगळवार दि. 12 एप्रिल, रोजी दुपारी 3 वाजता Google Meet App  या ॲपवर आयोजित करण्यात आले आहे.

 

https:meet.google.com/hmf-qarr-kdv   आणि त्याचा प्रवेशित hmf-qarr-kdv  टाकूण वेबिनारला जॉईन व्हावे. यामध्ये अर्ज सादर कसे करावे. अर्ज सादर करतांना सोबत कोणते दस्ताऐवज सादर करावे. या बाबत सविस्तर मार्गदर्शन पॉवर पॉईट प्रेझेंटेशन व्दारा ऑनलाईन पध्दतीने उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

 

 

तसेच ज्या अर्जदारांना त्रुटी पुर्ततेबाबत SMS  व ईमेल आलेले आहेत. अशांनी तात्काळ त्रुटी पुर्तता सादर करावी. तसेच 12 वी विज्ञान आणि CET  परीक्षा देणारे अशा विदयार्थ्यांचे अर्ज सादर करणे राहिलेले असतील त्यांनी तात्काळ या आठवडयात सादर करावे. तरी वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अर्ज करणाऱ्या मागासप्रवर्गातील उमेदवारांनी महाविदयालयातील प्राचार्य, कर्मचारी, विदयार्थी, पालक, इंटरनेट कॅफे ईत्यादींनी सदरील वेबिनार मध्ये सहभागी होवून मार्गदर्शन घ्यावे, असे आवाहन समिीतीच्या वतीने करण्यात येत आहे. असे संशोधन अधिकारी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती जळगाव यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

००००

समाज कल्याण विभागातर्फे ज्येष्ठ नागरीकांसाठी जनजागृती शिबीर    

  जळगाव, दि. 11 (प्रतिनिधी) : – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमाअंतर्गत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण जळगाव यांच्यावतीने दि. 12 एप्रिल, 2022 रोजी जिल्हयातील ज्येष्ठ नागरिकांचे जनजागृती शिबीर व या  मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

 या  कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांनी 12 एप्रिल रोजी सकाळी 10.00 वाजता जिल्हा नियोजन भवन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जळगाव येथे जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण योगेश पाटील यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

००००००

 समाज कल्याण विभागातर्फे रक्तदान शिबीर संपन्न

    जळगाव, दि. 11 (प्रतिनिधी) : – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमा अंतर्गत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण जळगाव यांच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन जळगाव येथे रक्तदान शिबीर संपन्न झाले, शिबीराचे उदघाटन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण जळगाव योगेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक संतोष सोनवणे, सहा- पोलिस उप निरीक्षक भरत चौधरी , कार्यालय अधिक्षक अरुण वाणी, वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक आर.डी.पवार समाज कल्याण निरीक्षक श्रीमती आशा बोरोले, समाज कल्याण निरीक्षक श्रीमती शोभा चौधरी, समाज कल्याण निरीक्षक श्री. महेंद्र चौधरी हे उपस्थित होते.

 

 सदरील शिबीरात मोठया प्रमाणात रक्तदात्यांनी सहभाग घेवून रक्तदान केले यामध्ये जळगाव जिल्हा  पोलिस दलातील अधिकारी व कर्मचारी बार्टीचे तालुका समन्वयक व समातदुत व सामाजिक व सांस्कृतिक संस्थेचे पदाधिकारी, समाज कल्याण अधिकारी व कर्मचारी इत्यादींनी सहभाग घेवून उत्स्पुर्त  प्रतिसाद दिला. शिबीराच्या यशस्वीरित्या बद्दल सहाय्यक आयुक्त यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ प्रविण मुंडे तसेच इंडियन रेडक्रॉस सोसायटी यांचे विशेष आभार मानले असे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण जळगाव यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

 

 

०००००

जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये

7 मे रोजी लोक अदालतीचे आयोजन

  जळगाव, दि. 11 (प्रतिनिधी) : – वर्षानुवर्षे विविध कारणांनी प्रलंबित राहणारे खटले आर्थिक चणचण, वेळेचा अपव्यय या सर्व गोष्टी टाळण्यासाठी व आपआपसात सामोपचाराने तडजोड घडवून वाद मिटावेत. याकरीता राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांचे निर्देशानुसार संपूर्ण देशात एकाच दिवशी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन शनिवार, दिनांक 7 मे, रोजी करण्यात आले आहे, त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्येही याचदिवशी लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव यांनी दिली आहे.

 

 

  जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा जिल्हा व  सत्र न्यायालयाच्या आवारात समितीचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी यांच्या अध्यक्षतेखाली प्रारंभ होईल. जिल्हा वकील संघ, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महानगर पालिकेचे आयुक्त यांचे सहकार्य लाभणार आहे. या लोकअदालतीमध्ये मोटर वाहन ट्रॉफिक चलन, भुसंपादन, धनादेश अनादर, वैवाहिक खटले, मोटार खटले, म्युनिसीपल अपील, दिवाणी व फौजदारी प्रकरणे, न्यायालयात प्रलंबित व इतर खटले तसेच खटला दाखलपुर्व प्रकरणे व एकूण ज्या खटल्यांमध्ये कायद्याने तडजोड करता येते, असे संपूर्ण खटले ठेवण्यात आलेले आहेत.

 

 

 

            या लोकअदालतींमध्ये आपसांत तडजोडीसाठी संपुर्ण जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर खटले ठेवण्यात आलेले आहेत. तसेच या राष्ट्रीय लोकअदालतींमध्ये राष्ट्रीयकृत बँका, कंपन्या, यांच्या संदर्भातील प्रलंबित दिवाणी व फौजदारी खटल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रक्कम वसुल होवून मिळण्याची शक्यता आहे. वादपुर्व/दाखलपुर्व खटल्यांमध्ये बॅका, कंपन्या, भ्रमणध्वनी कंपन्या, दुरध्वनी कार्यालय यांनी थकित रकमेमध्ये सुट देण्याचे प्रस्तावित केलेले आहे. तरी संबंधित थकित ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा ,

 

 

 

            ज्या पक्षकारांना तडजोडीने आपली प्रकरणे निकाली काढायचे आहेत. त्या पक्षकार व त्यांचे विधिज्ञ यांनी तडजोडीने प्रकरणे निकाली काढावे. तसेच ऐनवेळी ज्या पक्षकारांना आपले खटले निकाली काढण्यासाठी ठेवावयाचे असतील त्यांना सुध्दा ऐनवेळी खटले निकाली काढण्याची संधी देण्यात आली आहे. तरी त्यांनी लोकअदालतीस उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन सचिव, जिल्हा व विधी सेवा प्राधिकरण, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

0000

 

कोविडमुळे मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसास

सानुग्रह सहाय्याच्या धनादेशाचे वाटप

  जळगाव, दि. 11 (प्रतिनिधी) : – नागरी  स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कोव्हीड -19 शी संबंधित कर्तव्य बजावताना कोव्हिडामुळे मृत्यु होणाऱ्या कर्मचारी वृंद यांना 50 लखा रुपयाचे सानुग्रह सहाय्य्‍ अनुदान वितरीत करण्यत येत आहे.

 आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते कै. रोजश जिजाबराव साळूखे, मजुर – नगरपरिषद चोपडज्ञ, कै. प्रताप माधवराव बाविस्कर – शिपाई – नगरपरिषद – चोपडा, कै. विनोद मालोजीराव इशुलकर – गण मोल्हगिवर – नगरपरिषद – पारोळा, कै. राजेद्र रेवचंद भिवसेन – क्लिनर – नगरपरिषद – पाचोरा, कै. नरेंद्र युवराज अहिरे – समुदाय संघटक ( NULM  नगरपरिषद – पाचोरा, कै. वसंत लोटन पवार पंप ऑपरेटर – नगरपरिषद – अमळनेर,  कै गोकुळ सुकलाल सैदानशिव – लिपीक – नगरपरिषद – अंमळनेर, कैद्य प्रदिप गंभिर पारधे – वाहनचालक नगरपरिषद – फैजपूर, कै. रविद्र भ्विसन बागुल – सफाई कामगार नगरपरिषद – भडगाव, कै. प्रमोद दगडू बोरोले क्लिनर – नगरपरिषद – भुसावळ, कै. प्रकाश करणसिंग तुरकेले – सफाई कामगार – नगरपरिषद – भुसावळ, कै. विजयसिंग शंकरसिंग राजपुत – बिगारी – नगरपरिषद – भुसावळ , कै. सुरेशकुमार एकनाथ पारेराव – शिपाई – नगरपरिषद – धरणगाव, कै. सुरेश केशव शेळके – लिपिक – नगरपरिषद – वरणगाव, कै. अनिल संभाजी गवळी – मजूर – नगरपरिषद – चाळीसगाव, कै. वना धोंडु महाजन – मजूर – नगरपरिषद – एरंडोल , कै.बुधा शंकर सपकाळे – मजुर नगरपरिषद – एरंडोल, कै. सुर्यकांत धरमसिंग पाटील – औषध निर्माता – नगरपरिषद – यावल, इ.

 


Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्यातील शाळांना ‘या’ तारखेपासून उन्हाळी सुट्टी ; शिक्षण विभागाचे परिपत्रक जारी

Next Post

पाचव्या फेरीअखेर महिला गटात एअरपोर्ट ऑथोरिटी एकमेव संघ आघाडीवर

Related Posts

Bangladeshi Woman Trafficking | जळगावमध्ये देहविक्रीचा पर्दाफाश !

Bangladeshi Woman Trafficking | जळगावमध्ये देहविक्रीचा पर्दाफाश !

July 25, 2025
Bhusawal Railway Route Change | भुसावळ विभागातील रेल्वे मार्गात बदल, प्रवाशांनी नोंद घ्या!

Bhusawal Railway Route Change | भुसावळ विभागातील रेल्वे मार्गात बदल, प्रवाशांनी नोंद घ्या!

July 25, 2025
Doctor blackmail case Pachora : पाचोऱ्यात डॉक्टरला अश्लील क्लिप व्हायरल करण्याची धमकी, 2 कोटींची खंडणी, नेमकं प्रकरण काय?

Doctor blackmail case pachora : डॉक्टरला अश्लील क्लिप व्हायरल करण्याची धमकी, 2 कोटींची खंडणी, नेमकं प्रकरण काय?

July 25, 2025
मुख्यमंत्री सहायता निधी योजना कशी मिळवावी? Mukhyamantri Sahayata Nidhi Yojana Application Process

मुख्यमंत्री सहायता निधी योजना कशी मिळवावी? Mukhyamantri Sahayata Nidhi Yojana Application Process

July 25, 2025
Prafull Lodha Honeytrap : फोटोवरून राजकारण तापलं – खडसे यांचा महाजनांवर जोरदार हल्लाबोल

Prafull Lodha Honeytrap : फोटोवरून राजकारण तापलं – खडसे यांचा महाजनांवर जोरदार हल्लाबोल

July 25, 2025
Revenue officer trap  : जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात लाच  घेतांना महसूल अधिकारी आणि एजंट रंगेहाथ अटकेत

Revenue officer trap  : जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात लाच  घेतांना महसूल अधिकारी आणि एजंट रंगेहाथ अटकेत

July 24, 2025
Next Post
पाचव्या फेरीअखेर महिला गटात एअरपोर्ट ऑथोरिटी एकमेव संघ आघाडीवर

पाचव्या फेरीअखेर महिला गटात एअरपोर्ट ऑथोरिटी एकमेव संघ आघाडीवर

ताज्या बातम्या

Sex Racket Exposed in Mumbai | हॉटेलमध्ये परदेशी महिलांसह सेक्स रॅकेट उघड

Sex Racket Exposed in Mumbai | हॉटेलमध्ये परदेशी महिलांसह सेक्स रॅकेट उघड

July 27, 2025
Best banks for loans : कर्ज घेण्यासाठी सर्वोत्तम बँका कोणत्या?

Best banks for loans : कर्ज घेण्यासाठी सर्वोत्तम बँका कोणत्या?

July 27, 2025
Loan without CIBIL Score: क्रेडिट स्कोअर नसतानाही मिळणार कर्ज? हे ५ पर्याय वापरा!

Loan without CIBIL Score: क्रेडिट स्कोअर नसतानाही मिळणार कर्ज? हे ५ पर्याय वापरा!

July 27, 2025
Gold Loan फायदे, तोटे,व्याजदर आणि सावधगिरी - सोने तारण कर्ज संपूर्ण माहिती

Gold Loan फायदे, तोटे,व्याजदर आणि सावधगिरी – सोने तारण कर्ज संपूर्ण माहिती

July 27, 2025
Pune Rave Party : पुण्यात फ्लॅटवर रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा ; खडसेंचे जावई पोलिसांच्या ताब्यात

Pune Rave Party : पुण्यात फ्लॅटवर रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा ; खडसेंचे जावई पोलिसांच्या ताब्यात

July 27, 2025
Jilha Parishad Yojana 2025 |पिठाची गिरणी, शिलाई मशीन, तार कुंपणसह मिळवा 100% अनुदान!

Jilha Parishad Yojana 2025 |पिठाची गिरणी, शिलाई मशीन, तार कुंपणसह मिळवा 100% अनुदान!

July 27, 2025
Load More
Sex Racket Exposed in Mumbai | हॉटेलमध्ये परदेशी महिलांसह सेक्स रॅकेट उघड

Sex Racket Exposed in Mumbai | हॉटेलमध्ये परदेशी महिलांसह सेक्स रॅकेट उघड

July 27, 2025
Best banks for loans : कर्ज घेण्यासाठी सर्वोत्तम बँका कोणत्या?

Best banks for loans : कर्ज घेण्यासाठी सर्वोत्तम बँका कोणत्या?

July 27, 2025
Loan without CIBIL Score: क्रेडिट स्कोअर नसतानाही मिळणार कर्ज? हे ५ पर्याय वापरा!

Loan without CIBIL Score: क्रेडिट स्कोअर नसतानाही मिळणार कर्ज? हे ५ पर्याय वापरा!

July 27, 2025
Gold Loan फायदे, तोटे,व्याजदर आणि सावधगिरी - सोने तारण कर्ज संपूर्ण माहिती

Gold Loan फायदे, तोटे,व्याजदर आणि सावधगिरी – सोने तारण कर्ज संपूर्ण माहिती

July 27, 2025
Pune Rave Party : पुण्यात फ्लॅटवर रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा ; खडसेंचे जावई पोलिसांच्या ताब्यात

Pune Rave Party : पुण्यात फ्लॅटवर रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा ; खडसेंचे जावई पोलिसांच्या ताब्यात

July 27, 2025
Jilha Parishad Yojana 2025 |पिठाची गिरणी, शिलाई मशीन, तार कुंपणसह मिळवा 100% अनुदान!

Jilha Parishad Yojana 2025 |पिठाची गिरणी, शिलाई मशीन, तार कुंपणसह मिळवा 100% अनुदान!

July 27, 2025

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us