Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव जिल्ह्यातील दुसरा रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतला

najarkaid by najarkaid
May 6, 2020
in जळगाव, आरोग्य
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव दि. 6 – ‘बठ्ठा, डॉक्टर मना मायबाप शेतस्’ ! अशा शब्दात कोरोनामुक्त झालेल्या रुग्ण महिलेने आपल्या भावना व्यक्त केल्या. मुंगसे, ता. अमळनेर येथील 60 वर्षीय महिलेचे 14 दिवसांच्या उपचाराअंती शेवटचे दोनही अहवाल निगेटीव्ह आल्यानंतर त्यांना आज घरी पाठविण्यात आले.

कोरोनावर मात करणाऱ्या त्या जिल्ह्यातील दुसऱ्या तर पहिल्याच महिला रुग्ण ठरल्या आहेत.
जळगाव जिल्ह्यातील मुंगसे येथील महिला कोरोना बाधित आढळून आली होती. या महिला रुग्णाचा दुसरा व तिसरा तपासणी अहवाल निगेटीव्ह आला. त्यामुळे त्यांना आज टाळ्यांच्या गजरात घरी पाठविण्यात आले. रुग्णालयातून जाताना ही महिला भावनाविवश झालेली दिसून येत होती. शिवाय तीच्या चेहऱ्यावर आनंदही दिसत होता. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, वैद्यकीय अधिकारी डॉ किरण पाटील, डॉ विजय गायकवाड यांच्यासह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण वाढत असताना जिल्ह्यातील विशेषत: ग्रामीण भागातील पहिला रुग्ण तीही महिला आज कोरोनामुक्त होऊन घरी जाणार असल्याने येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोविड 19 रुग्णालय परिसरात सकाळपासून उत्साहाचे वातावरण होते. विशेषत: परिचारिकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. गेले चौदा दिवस त्यांनी धैर्यपूर्वक केलेल्या उपचारामुळे जिल्ह्यातील दुसरा व पहिलीच महिला रुग्ण बरी होऊन घरी जाणार होती. डॉ. खैरे आणि त्यांच्या टीमने 14 दिवस या रुग्णांवर उत्तमरितीने उपचार केले. उपचारादरम्यान वृद्ध महिलेनेही डॉक्टर आणि परिचारिकांना प्रतिसादही दिल्यानेच हे घडले.
आज या महिला रुग्णांस उत्साहात व टाळयांच्या गजरात निरोप देण्यात आला. यावेळी या महिलेस विचारले असता ‘बठ्ठा, डॉक्टर मना मायबाप, भाऊ शेतस्’ ! सगळयांचे चांगले होईल असा माझा आशिर्वाद असल्याचे उद्गार काढले आणि रुग्णालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घेतलेले परिश्रम सार्थकी लागले. त्यानंतर त्यांना एका रुग्णवाहिकेतून मुंगसे, ता. अमळनेर येथे त्यांच्या घरी पाठविण्यात आले.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी याबाबत समाधान व्यक्त करताना सर्व वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. आजच्या घटनेमुळे या आजारातून बरे होता येते हा विश्वास जिल्ह्यातील जनतेच्या मनात निर्माण करता आला. तर जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी विश्वासाने आणि जिद्दीने उपचार करणाऱ्या रुग्णालयाच्या टीमचे अभिनंदन केले. तसेच नागरिकांनी आजाराची लक्षणे दिसल्यास त्वरीत रुग्णालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले.
डॉ भास्कर खैरे, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय – जिल्ह्यातील कोरोनाचा दुसरा रुग्ण कोरोनामुक्त झाला याचे समाधान आहे. नागरीकांनी कोरोनाला घाबरु नये, पण काळजी घ्यावी. तसेच आमच्याकडे उपचार घेत असलेले रुग्ण लवकरच बरे होऊन त्यांना सुखरुप घरी पाठविण्यात आम्हाला यश येईल अशा अशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
डॉ. विजय गायकवाड, उपचार करणारे डॉक्टर- वैद्यकीय महाविद्यालय नव्यानेच सुरु झाले आहे. त्यातच हा आजार नवीन असल्याने सुरूवातीस भिती होती. शासनाच्या मार्गदर्शक सुचनांची माहिती सर्वाना दिली. रुग्णांना धीर देण्यावर भर दिला. हे एक टीमवर्क आहे. रुगण वाढत असताना जिल्हावासियांच्या आमच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. त्यामुळे रुग्ण बरे होत असल्याचे समाधान आहेच, त्यापेक्षाही रुग्णांना आम्ही बरे करू हा विश्वास मनात निर्माण झाला आहे.
कोरोना संसर्ग वार्डात पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार करण्यासाठी तीन शिप्टमध्ये डॉक्टर, पारिचारिक असा एकूण 36 जणांचा स्टॉप अहारोत्र कार्यरत होता. यात शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण पाटील, डॉ. विजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. मिलिंद पवार, डॉ. मारुती पोटे, डॉ. दत्तात्रय बिराजदार, विजय पंचलवार, सुयोग चौधरी, अमित भंगाळे, पारिचारिका व कर्मचारी, नेहा चौधरी, रोहन केळकर, शालीनी खानापूरकर, डॉ. प्रसाद, तुषार सोनवणे, गजानन चौधरी, सविता अग्नीहोत्री, जयश्री जोगी, सरला बागुल, नम्रता खानापूरकर, कविता तायडे, सुमित्रा वक्ते, लता त्रिमाली, मनिषा सोळुंखे, शंकुतला सुरवाडे, निलम पाटील यांनी अहारोत्र रुग्णांची सेवा केली. कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांवर यशस्वीपणे उपचार करुन त्याला 17 दिवसात बरे करण्यात या सर्वांचा महत्वाचा वाटा आहे. या कालावधीत जिल्हा सामान्य रुगणालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ दिलीप पाटोडे यांचेही सहकार्य लाभले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पाचोर्‍यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गिरीष महाजनांनी घेतला आढावा

Next Post

जळगाव जिल्ह्यात आज चार कोरोना बाधित रूग्ण आढळले

Related Posts

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

March 30, 2026
धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Next Post
भुसावळ : कोरोना बाधितांची संख्या दोन झाल्याने चिंता वाढली!

जळगाव जिल्ह्यात आज चार कोरोना बाधित रूग्ण आढळले

ताज्या बातम्या

CNP Nashik Recruitment 2026: नाशिक करंसी नोट प्रेसमध्ये 534 पदांची भरती जाहीर!

CNP Nashik Recruitment 2026: नाशिक करंसी नोट प्रेसमध्ये 534 पदांची भरती जाहीर!

April 7, 2026
Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

April 7, 2026
Google Data Centre Project India: भारतात 15 अब्ज डॉलरचा मेगा डेटा सेंटर प्रकल्प सुरू : 1.88 लाख रोजगाराची संधी

Google Data Centre Project India: भारतात 15 अब्ज डॉलरचा मेगा डेटा सेंटर प्रकल्प सुरू : 1.88 लाख रोजगाराची संधी

April 7, 2026
CET Exam Update : १२ एप्रिलची परीक्षा पुढे ढकलली; विद्यार्थ्यांचा गोंधळ वाढला

CET Exam Update : १२ एप्रिलची परीक्षा पुढे ढकलली; विद्यार्थ्यांचा गोंधळ वाढला

April 7, 2026
Crime News: धक्कादायक : शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थ्यावर अत्याचार

Crime News: धक्कादायक : शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थ्यावर अत्याचार

April 6, 2026
Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us